IND vs CAN, T20 World Cup 2024 
क्रीडा

IND vs CAN, T20 WorldCup 2024: फ्लोरिडाच्या मैदानात पावसाने घातला खोडा; भारत-कॅनडा सामना रद्द, दोन्ही संघांना मिळणार पॉईंट्स

फ्लोरिडाच्या मैदानात पाऊस पडल्यानं टी-२० वर्ल्डकपचा ग्रुप-ए मधील भारत-कॅनडा सामना रद्द झाला आहे. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळणार आहे.

Published by : Naresh Shende

India vs Canada Match Abandoned : भारत आणि कॅनडा यांच्यात फ्लोरिडाच्या मैदानात टी-२० वर्ल्डकप २०२४ चा ग्रुप-ए चा सामना खेळवला आज रात्री ८ वाजता खेळवला जाणार होता. परंतु, फ्लोरिडाच्या मैदानात पाऊस पडल्यानं भारत-कॅनडा सामना रद्द झाला आहे. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळणार आहे. सेंट्रल ब्रोवार्ड रिजनल पार्क स्टेडियममध्ये हा सामना खेळवला जाणार होता. मात्र, पावसामुळे खेळपट्टील ओलावा आल्याने सामना अखेर रद्द करावा लागला.

सामन्यादरम्यान पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली होती. त्यानंतर आज सायंकाळी फ्लोरिडात पावसाच्या सरी कोसळल्यानं भारत-कॅनडा सामना रद्द करावा लागला. फ्लोरिडात पूर्ण दिवस ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. फ्लोरिडाच्या लॉडरहिलमध्ये पावसाची शक्यता दिवसा ५७ टक्के तर रात्री २४ टक्के वर्तवण्यात आली होती. अखेर मैदानात पाऊस पडल्यानं नाणेफेक उशिरा होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. परंतु, सामन्यासाठी मैदानात पोषक वातावरण नसल्यानं आज होणारा भारत-कॅनडाचा सामना रद्द झाला.

दरम्यान, भारताने सलग तीन सामन्यांमध्ये विजय मिळवून आधीच सुपर ८ साठी क्वालिफाय केलं आहे. पावसामुळं सामना रद्द झाला असला, तरीही टीम इंडियाच्या समीकरणावर कोणताच परिणाम होणार नाही. मागील काही दिवसांपासून फ्लोरिडातील हवामान खराब आहे. मुसळधार पाऊस कोसळल्याने त्या ठिकाणी पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली.

लॉडरहिलच्या मैदानावर आतापर्यंत १८ टी-२० सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला ११ सामन्यांमध्ये विजय मिळाला आहे. तर प्रथम क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने ४ सामने जिंकले आहेत. या मैदानावर २४५ हा सर्वाधिक स्कोअर आहे. तर ७६ हा सर्वात लहान स्कोअर या मैदानावर झाला आहे. ही खेळपट्टी फलंदाजांसाठी जास्त पोषक आहे. याशिवाय या मैदानात भारताने टी-२० चे एकूण ८ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये भारताने ५ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे, तर २ सामन्यांमध्ये भारताचा पराभव झाला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा