India vs Ireland Team Lokshahi
क्रीडा

India vs Ireland : दीपक हुडाच्या दमदार खेळीने भारताचा 4 धावांनी विजय

भारत आणि आयर्लंड (India vs Ireland) यांच्यातील दुसरा टी-20 सामना डबलिनमधील ‘द व्हिलेज स्टेडियम’वर (मालाहाइड) खेळवण्यात आला.

Published by : shamal ghanekar

भारत आणि आयर्लंड (India vs Ireland) यांच्यातील दुसरा टी20 सामना डबलिनमधील ‘द व्हिलेज स्टेडियम’वर (मालाहाइड) खेळवण्यात आला. हा सामना अतीतडीचा होता. भारताने दुसऱ्या टी20 सामन्यामध्ये 226 धावांचे आव्हान आयर्लंड संघला देण्यात आले होते. हे आव्हान पूर्ण करण्यात आयर्लंडचा संघ केवळ 4 धावांनी कमी पडला. ज्यामुळे दुसरा टी20 सामना भारताने 2-0 ने जिंकला आहे.

भारत आणि आयर्लंड सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून भारताने पहिला फलंदाजीचा निर्णय घेतला होता. ईशान किसन लवकर बाद झाल्याने त्यानंतर दीपक हुडा (Deepak Hooda) आणि संजू सॅमसन (Sanju Samson) या जोडीने धमाकेदार फलंदाजी केली. दीपकने 57 चेंडूत 9 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 104 धावा केल्या. तर संजूने 42 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 77 धावा केल्या. या सामन्यामध्ये भारताचे कार्तिक, अक्षर आणि हर्षल हे तीन खेळाडू शून्यावर बाद झाले. भारताचे संजू आणि दीपकच्या खेळीच्या जोरावर 225 धावांचे आव्हान आयर्लंड संघासमोर ठेवण्यात आले होते.

जेव्हा आयर्लंड संघ 226 धावांचं आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरले आणि त्यांनी सुरूवातीपासूनच चांगली कामगिरी करायला सुरुवात केली. पहिल्या सलामीवीर जोडीने 72 धावांची भागिदारी केली. त्यानंतर कर्णधार अँन्ड्रूयने 60 धावांची खेळी करून त्यानंतर तोही बाद झाला. तसेच हॅरी 39 धावा करुन बाद झाला. तर जॉर्जने नाबाद 34 धावा केल्या. पण हे आव्हान पूर्ण करण्यात आयर्लंडचा संघ केवळ 4 धावांनी कमी पडला. त्यामुळे भारताने ही मालिका 2-0 ने जिंकली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा