IND vs NED T20 World 
क्रीडा

भारतीय संघ आता नेदरलँड्सशी दोन हात करणार; जाणून घ्या कधी, कुठं होणार सामना?

पाकिस्तानविरुद्ध थरारक विजयानंतर भारतीय संघ आज नेदरलँड्सविरुद्ध दोन हात करेल. हा सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर होणार आहे.

Published by : Pankaj Prabhakar Rane

नेदरलँड्सनं गेल्या चारपैकी दोन सामने जिंकले आहेत आणि दोन सामने गमावले आहेत. ज्या सामन्यात नेदरलँड्सचा पराभव झालाय, त्या सामन्यात त्यांनी विरोधी संघाला कडवी झुंज दिली आहे. नेदरलँड्सचा श्रीलंकेविरुद्ध 16 धावांनी तर, बांग्लादेशकडून अवघ्या नऊ धावांनी पराभव झाला. अशा परिस्थितीत नेदरलँड्सला हलक्यात घेणे भारतीय संघाला महागात पडू शकतं.

भारत विरुद्ध नेदरलँड्स यांच्यातील सामना आज गुरूवारी सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार, हा सामना दुपारी 12.30 वा. सुरू होईल. तर, अर्धातास अगोदर नाणेफेक होईल.

असा असेल भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, ऋषभ पंत, दीपक हुडा, हर्षल पटेल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : माझ्यावर राजकीय हेतूनं ईडीचे आरोपपत्र; रोहित पवार यांचं स्पष्टीकरण

Latest Marathi News Update live : मुंबईत अनेक ठिकाणी दुपारी बारा वाजता जल्लोष होणार

Aajcha Suvichar - आजचा सुविचार

Horoscope |'या' राशीच्या लोकांना आजचा दिवस फायदेशीर असेल, जाणून घ्या कसा आहे आजचा दिवस ?