India Vs New Zealand 2nd T20 Team Lokshahi
क्रीडा

दुसऱ्या अटीतटीच्या सामन्यात भारताचा विजय; मालिका जिंकण्याचं स्वप्न बळावलं

दुसऱ्या निर्णायक सामन्यात भारताचा न्यूझीलंडवर 6 विकेट्सने विजय

Published by : Sagar Pradhan

न्यूझीलंड विरोधातील एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर आता या दोन्ही संघात टी-20 मालिका सुरु आहे. या मालिकेत भारताला पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आज या दोन्ही संघात याच मालिकेतील दुसरा निर्णायक सामना खेळवला गेला. आज खेळवल्या गेलेल्या या अटीतटीच्या सामन्यात शेवटी भारताने विजय मिळवला. भारताला अवघ्या 100 धावाचं लक्ष्य असतानाही अखेरच्या षटकापर्यंत सामना गेला. या विजयासोबतच मालिका जिंकण्याचे ध्येय देखील कायम ठेवले आहे. या विजयासह भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.

न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण आजची खेळपट्टी गोलंदाजांसाठी अधिक चांगली होती, ज्याचा फायदा घेत भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडचा फलंदाजांना केवळ 99 धावांतच तंबुत पाठवले. 100 धावांच्या माफक लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघला शेवटपर्यंत लक्ष्य गाठण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली. चौथ्या षटकांत शुभमन गिल 11 रन करुन बाद झाल्यावर भारताचा डाव फारच स्लो झाला. ईशान किशन लयीत दिसत होता, पण राहुल त्रिपाठी आणि त्याच्यात योग्य ताळमेळ न झाल्याने तो धावचीत झाला. 13 रन करुन राहुलही बाद झाला. सूर्यकुमार आणि सुंदर डाव सावरत होते, तोच पुन्हा चूकीच्या ताळमेळामुळे सुंदर 10 धावांवर धावचीत झाला. पण मग कॅप्टन हार्दिक पांड्या आणि उपकर्णधार सूर्यकुमार यादव यांनी अनुक्रमे नाबाद 15 आणि नाबाद 26 धावा करत 19.5 षटकांत भारताला सामना जिंकवून दिला. 

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mahayuti : महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस

Ind Vs Eng Mohammed Siraj : इंग्लंडचा कार्यक्रम केला! मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या अन् पाहा काय झाल

Mobile Hang Problem: मोबाईल सतत होतोय हँग? जाणून घ्या कारण...