क्रीडा

India Vs South Africa 2nd Test : दक्षिण आफ्रिकेला 122 धावांची गरज, तर भारत विजयापासून 8 विकेट दूर

Published by : Lokshahi News

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी २४० धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. दक्षिण अफ्रिकेसमोर 2 गडी गमावून 118 धावा केल्या आहेत.सध्या दक्षिण आफ्रिकेला 122 धावांची गरज आहे, तर भारत विजयापासून 8 विकेट दूर आहे.

भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरु आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी २४० धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. भारताने दुसऱ्या डावात २६६ धावांची खेळी केली. मात्र दक्षिण आफ्रिकेकडे पहिल्या डावातील २७ धावांची आघाडी होती. त्यामुळे २३९ धावा झाल्या आणि विजयासाठी दक्षिण आफ्रिकेला २४० धावांचं आव्हान मिळालं आहे.

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून दक्षिण आफ्रिकेच्या दोन बाद 118 धावा झाल्या आहेत. कर्णधार एल्गर नाबाद (46) आणि रेसी वान डर डुसें (11) धावांवर खेळत आहे. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी अजून 122 धावांची गरज आहे. विजयाचे पारडं दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने झुकलेलं आहे.

तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकत १-० ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे हा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचा भारताचा प्रयत्न आहे. तर दक्षिण अफ्रिका हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raigad Boat Accident : रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, बचावकार्य युद्धपातळीवर

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली

Raj Thackeray : "कोण जैन लोक आहेत जी...", फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालासह अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या