क्रीडा

भारताचा विजय, दक्षिण आफ्रिका 16 धावांनी पराभूत

Published by : Siddhi Naringrekar

गुवाहाटीमध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेनं 20 षटकात तीन बाद 221 धावाच केल्या आणि टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेवर 16 धावांनी विजय मिळवलाय. भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ३ बाद २३७ धावा केल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा डाव २० षटकांत ३ बाद २२१ धावांवर मर्यादित राहिला. डेव्हिड मिलर (४७ चेंडूंत नाबाद १०६) आणि क्विंटन डीकॉक (४८ चेंडूंत नाबाद ६९) यांचे प्रयत्न अपयशी ठरले.

भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठी धावसंख्या उभारली. 20 षटकांत 3 गडी गमावून 237 धावा केल्या. टी-20 मधील दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. सूर्यकुमार यादव (२२ चेंडूंत ६१ धावा) आणि केएल राहुलच्या (२८ चेंडूंत ५७) फटकेबाज अर्धशतकांच्या बळावर भारताने रविवारी दुसऱ्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर १६ धावांनी मात केली.

यासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. सूर्यकुमार व विराट कोहली यांनी ४३ चेंडूंत १०२ धावांची भागीदारी केली. कोहलीने २८ चेंडूंत सात नाबाद ४९ धावा केल्या.

"भाजप सरकारच्या नादानपणामुळे भारतीय सैनिकांवर हल्ला झाला"; 'मशाल' पेटवून उद्धव ठाकरेंचं PM मोदींवर शरसंधान

IPL 2024 : धरमशाला मैदानात चेन्नई बनला सुपर 'किंग'! पंजाबचा केला दारुण पराभव

"तुतारीची आता पिपाणी करायची आहे"; फलटणच्या सभेत उपमुख्यमंत्री फडणवीसांचा शरद पवारांवर हल्लाबोल

अलिबागच्या सभेत उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर निशाणा, म्हणाले; "एकनाथ खडसेंचा मला फोन आला आणि..."

"छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला पण आज परिस्थिती बदलली"; शरद पवारांचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा