क्रीडा

India vs South Africa 3rd Test, DAY 1 LIVE | कोहली-पंत खेळपट्टीवर स्थिरावले

Published by : Lokshahi News

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा कसोटी सामना आजपासून केपटाऊनमध्ये सुरु झाला आहे. भारताच्या पहिल्या डावाला सुरूवात झाली असून आतापर्यत 145 धावावर 4 गडी बाद झाले आहेत. सध्या कोहली-पंत खेळपट्टीवर स्थिरावले आहेत.

भारतीय कसोटी कर्णधार विराट कोहलीने केपटाऊनमध्ये पुनरागमन केले आहे. त्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.मयंक अग्रवाल आणि केएल राहुल यांनी भारताच्या डावाची सुरुवात केली. भारताचं अर्धशतक पूर्ण होण्यापूर्वी हे दोघे तंबूत परतले. डुआन ऑलिव्हियर ने राहुलला (१२) तर कगिसो रबाडाने एडन मार्करामला (१५) झेलबाद केले. लंचपर्यंत विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी भारताचा डाव सावरला. लंचनंतर भारताने शतक पूर्ण केले पण डाव गडबडला. चांगल्या लयीत खेळणाऱ्या पुजाराला वेगवान गोलंदाज मार्को जानसेनने झेलबाद केले. त्यानंतर आलेला अजिंक्य रहाणे रबाडाचा बळी ठरला. पुजाराने ७ चौकारांसह ४३ तर रहाणेने ९ धावा केल्या. चहापानापर्यंत भारताने ५४ षटकात ४ बाद १४१ धावा केल्या. विराट ४० तर ऋषभ पंत १२ धावांवर नाबाद आहे.

दोन्ही संघ मालिकेत 1-1 असे बरोबरीत आहेत. सेंच्युरियनची पहिली कसोटी भारताने तर जोहान्सबर्गची कसोटी दक्षिण आफ्रिकेने जिंकली आहे. केपटाऊनमध्ये जिंकणारा संघ मालिकाविजेता ठरणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये चुरशीचा सामना पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Uddhav Thackeray on Eknath Shinde : "एका गद्दाराने काल 'जय गुजरात' अशी घोषणा केली" उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर निशाणा

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात चिमुकलीने जिंकली मनं ! राज ठाकरेंना म्हणाली 'I love You तर...

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : सुखद ! काका-पुतण्याच्या गळाभेटीने महाराष्ट्र सुखावला, आता पुढे काय होणार ? याकडे सगळ्यांचेच लागले लक्ष

Sushil Kedia Apologizes : मराठीबद्दल वादग्रस्त विधानानंतर अखेर सुशील केडियाने मागितली माफी