india vs south africa Team Lokshahi
क्रीडा

India Vs South Africa 3rd T20: आज होणार भारत विरुद्ध द.आफ्रिकेमध्ये शेवटचा टी-20 सामना

भारतीय संघ द.आफ्रिकेला क्लीन स्वीप करण्याच्या हेतूने मैदानात उतरणार

Published by : Sagar Pradhan

द.आफ्रिका संघ सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. भारतीय संघ घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. मालिकेतील तिसरा आणि निर्णयाक सामना आज (४ ऑक्टोबर) इंदूरमध्ये खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. या सामन्यात भारत द. आफ्रिकेच्या संघाला क्लीन स्वीप देणार का याकडे क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागले आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा T20 सामना इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल.तर नाणेफेक 6.30 वाजता होईल.

असे असतील दोन्ही संघ?

भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (डब्ल्यूके), दिनेश कार्तिक (डब्ल्यूके), आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, शाहबाज अहमद अर्शदीप सिंग, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर, मोहम्मद सिराज.

दक्षिण आफ्रिका संघ :

टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रेझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अॅनरिक नोर्किया, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, रिले रॉसो, ट्रिझो, ट्रिझो, ट्रायजे स्टब्स, योर्न फॉर्च्यून, मार्को जॅन्सन आणि ए. फेलुकायो.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा