क्रीडा

आजपासून भारत विरुद्ध श्रीलंका एकदिवसीय मालिकेला सुरुवात

Published by : Siddhi Naringrekar

आजपासून भारत विरुद्ध एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना गुवाहाटीच्या बरसापरा स्टेडियमवर खेळला जणार आहे. दुपारी 1.30 वाजता सामना सुरू होईल. या सामन्यात टीम इंडियाचा पारडं जड दिसत असला तरी श्रीलंकेचा नुकताच झालेला एकदिवसीय विक्रमही चांगलाच गाजला आहे.भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत तब्बल 162 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता भारतानं यामध्ये 93 सामने जिंकले.

त्यानंतर दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे 12 जानेवारीला कोलकाता आणि 15 जानेवारीला तिरुवनंतीपुरम येथे खेळवला जाईल. रोहित, विराट आणि केएल राहुल टीम इंडियात एकदिवसीय मालिकेसाठी परतले आहेत. सीनियर्सच्या पुनरागमनामुळे संघ मजबूत होईल पण त्याचवेळी प्लेइंग-11 निवडण्यात मोठी अडचण निर्माण होईल. भारताच्या शेवटच्या वनडेत द्विशतक झळकावणाऱ्या इशान किशनला यावेळी बाहेर बसावे लागण्याची शक्यता आहे. टीम इंडियाचा फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये चांगला समतोल आहे, पण असे असतानाही शेवटच्या वनडे मालिकेत बांगलादेशकडून पराभवाचा सामना करावा लागला.

भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शुभमन गिल, ईशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, उमरान मलिक, अर्शदीप सिंह.

श्रीलंकेचा संघ : दासुन शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस, चारिथ अस्लंका, आशान बंडारा, वानिंदू हसरंगा, अविष्का फर्नांडो, नुवानिंदू फर्नांडो, चमिका करुणारत्ने, लाहिरू कुमरा, दिलशान मदुशंका, पथुम निसांका, प्रमोद मदुशान, सामुना राजविरा, कासून, महाराणी, महाराणी, नुवानिंदू फर्नांडो, जेफ्री वँडरसे, ड्युनिथ वेलाल्गे.

सामने कुठे पाहाल?

भारत आणि श्रीलंका एकदिवसीय मालिकेतील सर्व सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं.

सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश; अंधारेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या...

Ujjwal Nikam : उज्ज्वल निकम आज उमेदवारी अर्ज दाखल करणार; म्हणाले...

Avinash Jadhav : मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल

उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या...

Rahul Gandhi : रायबरेलीतून राहुल गांधी यांना उमेदवारी जाहीर