क्रीडा

IND vs WI 3rd ODI : डकवर्थ-लुईसचा विंडीजला फटका; तिसऱ्या सामन्यासह मालिकाही गमावली

भारत आणि वेस्ट इंडीज (IND vs WI 3rd ODI) दरम्यान सुरू असलेली तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका भारताने ३-० अशी जिंकली. भारताने वेस्ट इंडीजचा डकवर्थ-लुईस नियमाप्रमाणे ११९ धावांनी पराभव केला. अडथळ्यामध्ये भारताने ३६ षटकांत तीन गडी गमावून २२५ धावा केल्या होत्या

Published by : Siddhi Naringrekar

भारत आणि वेस्ट इंडीज (IND vs WI 3rd ODI) दरम्यान सुरू असलेली तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका भारताने ३-० अशी जिंकली. भारताने वेस्ट इंडीजचा डकवर्थ-लुईस नियमाप्रमाणे ११९ धावांनी पराभव केला. अडथळ्यामध्ये भारताने ३६ षटकांत तीन गडी गमावून २२५ धावा केल्या होत्या. डकवर्थ-लुई नियमानुसार यजमानांना ३५ षटकांमध्ये २५७ धावांचे लक्ष्य मिळाले होते. मात्र, २६ षटकांमध्येच विंडीजचा सर्व संघ गारद झाला. त्यांना १३७ धावांपर्यंत मजल मारता आली.

वेस्ट इंडीजला त्यांच्या मायभूमीत व्हाईट वॉश देण्याची कामगिरी करणारा शिखर धवन पहिलाच भारतीय कर्णधार ठरला आहे. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बुधवारी (२७ जुलै) पोर्ट ऑफ स्पेनमधील क्वीन्स पार्क ओव्हल क्रिकेट स्टेडियममध्ये झाला. दोन अर्धशतकी खेळी करणाऱ्या शुबमनला मालिकावीराचा आणि सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

पावसामुळे भारताचा डाव ३६ षटकांमध्येच संपवण्यात आला. भारताने ३६ षटकांत तीन गडी गमावून २२५ धावा केल्या. भारताचा शुबमन गिल ९८ धावांवर नाबाद राहिला. त्याने ९८ चेंडूंमध्ये सात चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ९८ धावा केल्या. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. कर्णधार शिखर धवन आणि शुबमन गिल या जोडीने पहिल्या गड्यासाठी शतकी भागीदारी करत भारताला चांगली सुरुवात करून दिली. दोन्ही खेळाडूंनी मिळून ११३ धावा केल्या.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा