ICC Ranking Team Lokshahi
क्रीडा

IPL पॉईंट टेबल तर पाहाच; पण ICCच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचा कितवा नंबर जाणुन घ्या

काही दिवसांपुर्वी भारतीय संघ तिन्ही फॅारमॅटमध्ये अव्वल स्थानावर होता. मात्र सध्या ते स्थान संघाने कायम ठेवले आहे की त्यामध्ये काही बदल झालाय हे वाचा.

Published by : Sagar Pradhan

सध्या देशात आयपीएल मोठ्या जोशात आणि उत्साहात पार पडत आहे. परंतु, दुसरीकडे आयसीसी रँकिंगमध्ये देखील भारत उत्तम परिस्थितीत असल्याचे दिसुन येत आहे. भारतीय पुरुष क्रिकेट संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. 2023 या नवीन वर्षात संघ एकामागोमाग असे आयसीसीच्या तीनही फॉरमॅटमधील सर्व सामने जिंकत आहे. काही दिवसांपूर्वी भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मधील पहिला सामना देखील जिंकला. या सोबतच जाणून घ्या भारतीय संघ कोणत्या फॅारमॅटमध्ये कितव्या स्थानावर आहे.

एकदिवसीय सामन्याच्या आयसीसी रँकिंगमध्ये भारतीय संघ सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. 113 पॉइंटसह ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे.

तर कसोटी सामन्यांच्या रँकिंगमध्ये देखील भारताने आपले प्रथम स्थान कायम ठेवले आहे. या कसोटी सामन्यांच्या रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे.

टी-20 सामन्यांच्या रॅंकिंगमध्ये देखील भारतीय संघ अव्वल स्थानावर आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा