क्रीडा

Asian Games 2023: भारताच्या खेळाडूंनी रचला इतिहास, लांब उडीत जिंकलं पदक

केरळच्या अ‍ॅन्सीने ही मोठी कमाल केली आहे. अ‍ॅन्सीने महिलांच्या लांब उडीत कडवी टक्कर देत रौप्यपदक जिंकलं आहे.

Published by : Team Lokshahi

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंचा जलवा कायम असल्याचे दिसून येत आहे. भारताच्या ॲन्सी सोजन एडाप्पिल्लीने मोठा इतिहास रचला आहे. केरळच्या अ‍ॅन्सीने ही मोठी कमाल केली आहे. अ‍ॅन्सीने महिलांच्या लांब उडीत कडवी टक्कर देत रौप्यपदक जिंकलं आहे.

सध्य़ा आशियाई क्रीडा स्पर्धा चीनमध्ये खेळवल्या जात आहेत. या स्पर्धेतील भारतीय खेळाडू चांगलं प्रदर्शन करत आहेत. रविवारी एका दिवसात भारताला १५ पदकं जिंकण्यात यश आलं होतं. त्यानंतर भारतासाठी नववा दिवस देखील चांगला ठरत आहे. भारताला ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये २ पदकं मिळाल्यानंतर आणखी एका महिला लांब उडीपटूने पदकं जिंकून दिलं आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिलांचा लांब उडी इवेंट पार पडला. या प्रकाराच भारताच्या सोजन इडापिल्ली हीने रौप्य पदक जिंकले आहे. तिने ६ मीटर ६३ सेंटीमीटर उडी मारुन पदक आपल्या नावावर केले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा