क्रीडा

India vs England; इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्याआधी भारताचा ‘हा’ फलंदाज तंदुरूस्त

Published by : Lokshahi News

लोकशाही न्यूज नेटवर्क | ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यात भारतीय संघाला दुखापतीचे ग्रहण लागले होते. या मालिकेनंतर आता भारताचे खेळाडू तंदुरूस्त होऊन मैदानात उतरत आहे. यामध्ये आता इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्याआधी भारताचा दिग्गज फलंदाज लोकेश राहुल तंदुरूस्त होऊन कसोटी सामन्यासाठी सज्ज झाला आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाचा इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, आर अश्विन, हनुमा विहारी, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, रवींद्र जडेजा आदी खेळाडू दुखापतग्रस्त झाले होते. या मालिकेनंतर हे खेळाडू आता तंदुरूस्त होऊन मैदानात उतरण्यास सज्ज झाले आहेत. तीनही कोरोना चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी सोमवारपासून इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सरावाला सुरुवात केली.

५ फेब्रुवारीला दोन्ही संघांमध्ये मालिकेतील पहिला सामना सुरू होणार आहे. ऑस्ट्रेलियातील पहिल्या कसोटीनंतर रजेवर गेलेला कर्णधार विराट कोहलीचे पुनरागमन होत असल्यानं चाहते आनंदात आहेत. त्यात टीम इंडियासाठी एक आनंदाची बातमी आहे. टीम इंडियातील स्टार फलंदाज लोकेश राहुल दुखापतीतून पूर्णपणे सावरला असून तोही चेन्नईत दाखल होण्यासाठी निघाला आहे.

"मी पूर्णपणे तंदुरुस्त झालो आहे, हे सांगताना आनंद होतोय. यापेक्षा चांगली फिलींग असूच शकत नाही. घरच्या मैदानावर होणाऱ्या मालिकेसाठी उत्सुक आहे,"असे राहुलनं ट्विट केलं.

भारतीय संघ : रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल, रिषभ पंत, वृद्धिमान साहा, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, आर. अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर.
नेट बॉलर : अंकित राजपूत, आवेश खान, संदीप वारियर, के. गौतम आणि सौरभ कुमार;
राखीव खेळाडू : के. एस. भरत (यष्टीरक्षक), शाहबाज नदीम, राहुल चाहर आणि अभिमन्यू ईश्वरन.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा