Rohit Sharma Team Lokshahi
क्रीडा

Rohit Sharma : रोहित शर्माची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 15 वर्षे पूर्ण

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्यासाठी आजचा दिवस खूप खास आहे.

Published by : shamal ghanekar

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्यासाठी आजचा दिवस खूप खास आहे. कारण रोहित शर्माने आजच्या दिवशी 23 जून 2007 ला क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आजच्या दिवसाला आज 15 वर्ष पुर्ण झाले आहेत. भारताकडून आयर्लंडविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. याबद्दलची माहिती नुकतंच रोहित शर्मानं ट्वीटद्वारे दिली आहे.

रोहित शर्माने आंतराष्ट्रीय क्रिकेटमधील (International Cricket Council) 15 वर्षांचा प्रवासाबद्दल एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये रोहित शर्मा म्हणाला की, "आजच्या दिवशी 15 वर्षांपूर्वी मी भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. नक्कीच हा एक प्रवास आहे जो मी आयुष्यभर जपेण. माझ्या या प्रवासात सहभागी झालेल्या सर्वांचे मी मानापासून आभार इच्छितो. मी भारतासाठी खेळावं म्हणून ज्यांनी मला मदत केली त्या सर्वांचे मी विशेष आभार मानतो. सर्व क्रिकेट प्रेमी, चाहते आणि समीक्षकांचे आभार. संघासाठी तुमचे प्रेम आणि समर्थन हेच ​​आम्हाला सर्व अडचणींवर मात करण्यासाठी मदत करते." असे रोहितने ट्वीट केले आहे.

भारत आणि इंग्लंड (ENG vs IND) यांच्यात कसोटी सामना येत्या 1-5 जुलैदरम्यान खेळलला जाणार आहे. भारत आणि इंग्लंड सामना बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन क्रिकेट स्टेडियमवर खेळण्यात येणार आहे.

रोहित शर्माने पदार्पण केल्यापासून भारतीय संघासाठी अनेक महत्त्वपूर्ण सामने खेळले आहेत. आतापर्यंत रोहित शर्माने 45 कसोटी, 230 एकदिवसीय आणि 125 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये रोहितच्या नावावर 9 हजार 283 धावांची नोद आहे. तसेच कसोटीत 3 हजार 137 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 3 हजार 313 धावा केल्या आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा