क्रीडा

Piyush Chawla Retirement : विराटपाठोपाठ आता 'या' क्रिकेटरने घेतली निवृत्ती ; भावनिक पोस्ट केली शेअर

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून पीयूष चावलाची निवृत्ती; दोन दशकांचा प्रवास संपला

Published by : Shamal Sawant

भारतीय क्रिकेटपटू पीयूष चावलाने निवृत्ती जाहीर केली आहे. सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहून त्याने याची घोषणा केली. पियुष चावलाने 2012 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. भारताकडून खेळताना, चावलाने व्यावसायिक क्रिकेटमध्ये सर्व फॉरमॅटमध्ये एकूण 1000 हून अधिक विकेट्स घेतल्या. 2012 मध्ये शेवटचा सामना होईपर्यंत चावलाने 6 वर्षांत भारतासाठी 3 कसोटी, 25 एकदिवसीय आणि 7 टी-20 सामने खेळले आणि एकूण 43 विकेट्स घेतल्या.

काय लिहिलं पोस्टमध्ये :

"मैदानावर दोन दशकांपेक्षा अधिक काळ घालवल्यानंतर, आता अलविदा म्हणण्याची वेळ आली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करणं, 2007 चा टी20 विश्वचषक आणि 2011 च्या वनडे विश्वचषक विजयी संघाचा भाग असणं या अविश्वसनीय प्रवासातील प्रत्येक क्षण माझ्यासाठी आशीर्वादासारखा होता. या आठवणी नेहमी माझ्या मनात कायम राहतील.तसेच इंडियन प्रीमियर लीग हा माझ्या कारकिर्दीचा एक खास भाग राहिला आहे आणि या प्रवासातील प्रत्येक क्षणाचा मी आनंद घेतला आहे."

पीयूषने वडिलांचेदेखील आभार मानले आहेत. त्याने लिहिले की, "माझ्या स्वर्गीय वडिलांचा विशेष उल्लेख करतो. त्यांच्या विश्वासामुळे मला आत्मविश्वास मिळाला. त्यांच्याविना हा प्रवास कधीच शक्य झाला नसता."

नंतर त्याने लिहिले की, "पुढे पियुष चावलाने लिहिले की, "आजचा दिवस माझ्यासाठी फार भावनिक आहे, कारण मी अधिकृतपणे क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्तीची घोषणा करतो आहे. जरी मी आता खेळापासून दूर जात असलो, तरी क्रिकेट माझ्या अंतःकरणात सदैव जिवंत राहील. आता मी एका नव्या प्रवासासाठी तयार आहे, जिथे मी या सुंदर खेळातील भावना आणि शिकवण सोबत घेऊन पुढे चाललो आहे."

कारकीर्द :

मार्च 2006 मध्ये, चावलाने इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण करून इतिहास रचला. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा दुसरा सर्वात तरुण खेळाडू बनला. पियुष चावला चार फ्रँचायझींसाठी (PBKS, KKR, CSK आणि MI) आयपीएल खेळला आहे. चावलाने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत 192 सामने खेळले. त्याचा शेवटचा आयपीएल हंगाम २०२२-२४ दरम्यान मुंबई इंडियन्ससोबत होता.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Heavy Rain Alert : महाराष्ट्रानंतर आता 'या' राज्यात धुवांधार पावसाची एंट्री! येणारे चार दिवस सलग झोडपणार; 'या' जिल्ह्यांमध्ये IMD ने जारी केला अलर्ट

Saath Nibhana Saathiya Gopi Bahu : 'साथ निभाना साथिया' फेम 'गोपी बहू'ने गुपचुप केले लग्न, जाणून घ्या कोण आहे? जियाचा नवरा

GST Slab : आता अनेक वस्तूंवरील कर दर कमी होणार! GST चे चार पैकी दोन स्लॅब रद्द होणार; सर्वसामान्यांना मोठा दिलासा

Uttar Pradesh Crime : नोरा फतेहीसारखी फिगर मिळवण्यासाठी पतीने केला पत्नीचा छळ; नेमकं प्रकरण काय?