क्रीडा

Tokyo Paralympic 2020 | नेमबाज सिंहराज अधानची ‘कांस्य’कमाई; पंतप्रधानांनी केले अभिनंदन

Published by : Lokshahi News

टोकीओ पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी पदकाची लयलूटच सुरू ठेवली आहे.एका मागून एक खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करत पदक पटकावत आहेत. नेमबाज सिंहराज अधाना याने पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल एसएच १ फायनलमध्ये कांस्यपदक जिंकले आहे. या पदकासह भारताच्या नावावर आता आठ पदके जमा झाली आहेत.

नेमबाज सिंहराज अधाना याने पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल एसएच १ फायनलमध्ये कांस्यपदक जिंकले आहे. चीनच्या चाओ यांगने २३७.९ गुणांसह पॅरालिम्पिक विक्रम प्रस्थापित केला आणि सुवर्ण जिंकले, तर दुसरा चिनी खेळाडू जिंग हुआंगने २३७.५ गुणांसह रौप्यपदक जिंकले. सिंहराजने २१६.८ गुणांसह कांस्य जिंकले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कांस्यपदक जिंकल्याबद्दल सिंहराज अधानाचे अभिनंदन केले आहे. एका ट्वीटमध्ये, पंतप्रधान म्हणाले, की सिंहराजने कठोर परिश्रम केले आणि उल्लेखनीय यश मिळवले. त्याचे अभिनंदन आणि त्याच्या पुढील प्रयत्नांसाठी शुभेच्छा.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा