hockey team
hockey team team lokshahi
क्रीडा

CWG 2022 : कॉमनवेल्थ गेम्समध्ये महिला हॉकी संघाने 16 वर्षांनंतर जिंकले पदक

Published by : Shubham Tate

CWG 2022 : भारतीय महिला हॉकी संघाने 16 वर्षांनंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक जिंकले आहे. या सामन्यात भारतीय महिला संघाने चांगली कामगिरी करत न्यूझीलंडचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 2-1 असा पराभव केला. (indian womens hockey team wins bronze medal in commonwealth game)

महिला हॉकी संघ

सामन्याच्या अंतिम क्षणांमध्ये भारतीय संघ 1-0 ने आघाडीवर होता, परंतु शेवटच्या 30 सेकंदांपेक्षा कमी वेळात त्यांनी प्रतिस्पर्धी संघाला पेनल्टी कॉर्नर दिला. याचे रूपांतर पेनल्टी स्ट्रोकमध्ये झाले आणि ऑलिव्हिया मेरीने न्यूझीलंडला बरोबरी साधून दिली, त्यानंतर सामना शूट-आऊटमध्ये बरोबरीत सुटला.

16 वर्षांनंतर राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकले

भारतीय महिला हॉकी संघाने 16 वर्षांनंतर राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकले आहे. भारतीय महिला संघाने राष्ट्रकुल क्रीडा 2022 मध्ये हॉकीच्या कांस्यपदकाच्या सामन्यात पेनल्टी शूटआऊटमध्ये न्यूझीलंडचा 2-1 ने पराभव केला आणि कांस्यपदकावर कब्जा केला. भारतीय महिला हॉकी संघाने यापूर्वी 2006 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध हृदयद्रावक पराभव

भारताने संयम राखत शूटआऊटमध्ये विजय मिळवला. वादग्रस्त उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या हृदयद्रावक पराभवानंतर या सामन्यात खेळणाऱ्या भारतीय संघाने संपूर्ण सामन्यात चांगली कामगिरी करत पदक जिंकले. सलीमा टेटेच्या गोलमुळे भारत हाफ टाइमपर्यंत १-०ने पुढे होता. ब्रेकनंतर नेहा गोयलने संघाची आघाडी जवळपास दुप्पट केली, परंतु न्यूझीलंडने आपल्या बचावाच्या चांगल्या कामगिरीमुळे भारताला आपले स्थान बळकट होऊ दिले नाही.

IPL 2024 : आरसीबीने CSK विरोधात रचला इतिहास; टी-२० क्रिकेटमध्ये 'हा' कारनामा करणारा ठरला पहिला संघ

"लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांमध्ये महाविकास आघाडीनेच बाजी मारलीय"; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा मोठा दावा

"एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायला तयार होतो"; शरद पवारांच्या विधानाला संजय राऊतांनी दिलं रोखठोक प्रत्युत्तर, म्हणाले...

Patanjali: बाबा रामदेव पुन्हा अडचणीत; पतंजलीवर मोठी कारवाई

Dengue: राज्यात मागील पाच वर्षांत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ