Ind vs pak Team Lokshahi
क्रीडा

IndvsPak : भारताचे 'हे' तीन दिग्गज खेळाडु असायचे संकटमोचक, आता संघासाठी त्रासदायक

28 ऑगस्टला होणार भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला

Published by : Sagar Pradhan

IndvsPak : नुकताच भारताचा झिम्बाब्वे दौरा संपला आहे. या दौऱ्यात भारताने सहजरीत्या झिम्बाब्वेवर विजय प्राप्त केला. आता या दौऱ्यानंतर भारतीय आता कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी आशिया कपमध्ये भिडणार आहे. येत्या 28 ऑगस्टला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार आहे. नेहमीप्रमाणे हा एक हाय होल्टेज सामना असणार आहे. दोन्ही संघाची कसून तयारी या सामन्यासाठी सुरू आहे. मात्र, या मोठ्या सामन्याआधी भारताला त्याचे 3 संकटमोचकच अडचणीत आणू शकतात. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याआधी भारतासाठी स्वत:चे हे तीन स्टार त्रासदायक ठरु शकतात. केएल राहुल, विराट कोहली आणि आवेश खान यांचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. (India's 'these' three players used to be troublemakers)

विराट कोहलीचा खराब फॉर्म. मागच्या बऱ्याचकाळापासून विराट कोहली त्याच्या फॉर्मवरुन चर्चेत आहे. इंग्लंड दौऱ्यावर तो पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. तेव्हापासून तो ब्रेकवर आहे. आशिया कप स्पर्धेपासून कोहली मैदानावर पुनरागमन करणार आहे. प्रत्येकाच्या मनात आजही कोहलीच्या फॉर्मवरुन चिंता आहे. ब्रेकनंतर विराटला त्याचा हरवलेला सूर सापडणार का ? हाच प्रश्न पडला आहे. कोहली फॉर्म परत मिळाला नाही तर पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताच्या अडचणी वाढू शकतात.

भारताची अडचण ओपनिंग पासून सुरु होत आहे. गोलंदाजी पर्यंत समस्या कायम आहे. केएल राहुल दुखापतीमुळे बराच काळ मैदानाबाहेर होता. फिट झाल्यानंतर झिम्बाब्वे विरुद्धच्या वनडे सीरीज मधून त्याने पुनरागमन केलं. पण काही खास चालला नाही.पहिल्या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. दुसऱ्या सामन्यात तो अवघ्या 1 रन्स आणि तिसऱ्या सामन्यात 30 धावांवर आऊट झाला. मात्र, पाकिस्तान विरुद्ध राहुल भक्कम सुरुवात दिली नाही, तर डाव सांभाळण कठीण होईल.

आवेश खान पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याआधीपासूनच अडचण बनला आहे. झिम्बाब्वे विरुद्ध त्याला एक वनडे सामना खेळण्याची संधी मिळाली. ज्यात त्याने 66 धावा देऊन 3 विकेट घेतल्या. तो महागडा गोलंदाज ठरला. याआधी वेस्ट इंडिजमध्येही तो फ्लॉप ठरला. तो धावा देत असल्याने त्याचा फॉर्म चिंतेचा विषय आहे.

28 ऑगस्ट रोजी भारत-पाकिस्तान सामना

27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत यूएईमध्ये होणाऱ्या आशिया कप 2022 मध्ये सहा संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी श्रीलंका, भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान याआधीच पात्र ठरले आहेत. त्याचबरोबर सहावा आणि अंतिम संघ पात्रता स्पर्धेनंतर निश्चित होणार आहे. टीम इंडिया 28 ऑगस्टला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या कामांना यश मिळण्याची शक्यता , कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली