Shailesh Shelke | Greco-Roman tournament team lokshahi
क्रीडा

आंतरराष्ट्रीय मल्ल शैलेश शेळकेने ग्रिकोरोमन स्पर्धेत पटकावले विजेतेपद

पुनरागमण करत आपल्या कौशल्याची दिली प्रचिती

Published by : Shubham Tate

लातूर / (वैभव बालकुंदे) - उपमहाराष्ट्र केसरी तथा आंतरराष्ट्रीय मल्ल शैलेश शेळकेने पुण्याच्या सह्याद्री कुस्ती केंद्रात झालेल्या महाराष्ट्राच्या निवड चाचणीत कोल्हापूरच्या समीर देसाईचा पराभव करत विजेतेपद पटकावले. सहा महिने मैदानाबाहेर असलेल्या लातूर जिल्ह्यातील टाक्याच्या या मल्लाने पुनरागमण करत आपल्या कौशल्याची प्रचिती दिली. (International Mall Shailesh Shelke won the Greco-Roman tournament)

पुणे येथे नुकत्याच ३६ व्या नॅशनल गेमसाठी निवड चाचण्या झाल्या. यात लातूरच्या शैलेश शेळके ९७ किलो वजनी गटात ग्रिकोरोमन स्पर्धेत बाजी मारत विजेतेपद पटकावले.

अंतिम लढतीत कोल्हापुरच्या मल्लाला ३८ सेंकदात १०-०० ने पराभूत करीत प्रथम स्थान पटकावले. या गटात राज्यातून १२ मल्ल्यांनी सहभाग नोंदवला. यातील सर्वच कुस्त्या जिंकत शैलेशने आपली ताकद दाखवून दिली. या जोरावर त्याची गुजरात येथे २७ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या ३६ व्या नॅशनल गेमसाठी निवड झाली आहे.

त्याला आर्मी स्पोर्टस इस्टीट्युटचे विनायक दळवी, शिवशंकर भावले, आंतराराष्ट्रीय कुस्ती संकुलाचे प्रशिक्षक अर्जूनवीर काका पवार, गोविंद पवार यांनी मार्गदर्शन केले. स्लोव्हाकिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कॅडेट कुस्ती स्पर्धेत त्याने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. यासह काही वर्षांपुर्वी झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत तो उपविजेता होता.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींसाठी चांगला जाईल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या