क्रीडा

IPL 2023 : चेन्नई-गुजरातमध्ये आज रंगणार अंतिम लढत; कोण मारणार बाजी?

Published by : Shweta Shigvan-Kavankar

अहमदाबाद : आयपीएल 2023 चा ग्रँड फिनाले आज अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे. या सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज आणि हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स आमनेसामने असतील.

सीएसकेने आतार्यंत 4 वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे, तर दुसरीकडे गुजरात संघ एकदाच विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरला आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात संघ सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे, तर सीएसकेने 10व्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

धोनी अँड कंपनी पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावून मुंबई इंडियन्सची बरोबरी करू शकेल का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. मुंबईने 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. त्याचवेळी हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरातला इतिहास रचण्याची संधी असेल. गुजरातचा संघ विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरला तर सुरुवातीच्या दोन्ही हंगामात विजेतेपद पटकावणारा तो एकमेव संघ बनेल.

आयपीएलमध्ये चेन्नईविरुद्ध गुजरातचा रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. दोन्ही संघांमध्ये 4 सामने झाले आहेत. यात गुजरात संघ 4 वेळा आणि चेन्नई संघ 1 वेळा जिंकला आहे. आयपीएल 2023 च्या हंगामात, गुजरातने गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले. तर चेन्नईचा संघ दुसऱ्या क्रमांकावर होता. याच कारणामुळे या दोघांमध्ये क्वालिफायर-1 सामना होता.

सामन्यातील दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग-11

गुजरात टायटन्स: शुभमन गिल, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, मोहम्मद शमी आणि मोहित शर्मा.

चेन्नई सुपर किंग्ज: डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, अंबाती रायुडू/मथिशा पाथीराना, मोईन अली, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार/विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे आणि महेश टेकशन.

Health Tips: बदलत्या ऋतुमध्ये अशा प्रकारे घ्या स्वतःची काळजी

Sanjay Shirsat: श्रीमंत लोकांच्या माजलेल्या मुलांवर...; काय म्हणाले संजय शिरसाट?

Vijay Wadettiwar: पुण्यातील हिट अँड रन केस घटनेची न्यायिक चौकशी व्हावी; विजय वड्डेटीवार यांची मागणी

Dadar : दादरमधील इगो मीडिया कपनीचे होर्डिंग हटवले; होर्डिंग हटवले मात्र सांगडा कायम

Maharashtra Board 12th Result 2024 : 12 वीच्या परीक्षेचा निकाल बोर्डाच्या वेबसाईटवर ऑनलाइन जाहीर