क्रीडा

IPL Schedule : आयपीएलचे वेळापत्रक जाहीर; KKR विरुद्ध RCB सामन्याने होणार स्पर्धेला सुरुवात

आयपीएल २०२५: २२ मार्चपासून सुरुवात, KKR विरुद्ध RCB पहिला सामना. ७४ सामने, अंतिम सामना २५ मे रोजी कोलकत्ता ईडन गार्डनवर.

Published by : Team Lokshahi

आयपीएलची सर्वच आतुरतेने वाट पाहात असतात. पण आता प्रतीक्षा संपली आहे. बीसीसीआयने आयपीएलचे वेळापत्रक जाहीर केले असून आयपीएलच्या १८ व्या हंगामला २२ मार्च २०२५ पासून सुरुवात होणार आहे. आयपीएलचा हंगाम २२ ते २५ दरम्यान खेळला जाणार आहे. यावेळी आयपीएलचा KKR विरुद्ध RCB पहिला सामना पाहायला मिळणार आहे. हा सामना कोलकत्ता येथील ईडन गार्डनवर खेळला जाणार आहे.

या हंगामात एकूण ७४ सामने १३ ठिकाणे खेळले जाणार आहेत. दुपारचे सामने हे भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरु होतील. तर, संध्याकाळचे सामने हे भारतीय वेळेनुसार 7.30 वाजता सुरु होणार आहेत.

या हंगामात चेन्नई सुपर किंग आणि मुंबई इंडियन्स हे संघ दोनवेळा आमनेसामने येणार आहेत. त्याचवेळी, ७ एप्रिल रोजी आरसीबी आणि मुंबई इंडियन्स यांच्यात फक्त एकच सामना खेळला जाईल. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

या हंगामातील शेवटचा सामना हा २५ मे रोजी खेळला जाणार आहे. सुरुवातीचे आणि अंतिम सामने हे दोन्ही कोलकत्ता ईडन्स गार्डन येथे होणार आहे. आयपीएल २०२५ मध्ये ६५ दिवसांत एकूण ७४ सामने खेळवले जातील.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा