क्रीडा

IND vs SL | ”आयपीएल ऑल स्टार्स इलेव्हन”; श्रीलंकेच्या प्रशिक्षकाने केलं भारतीय टीमचं कौतुक

Published by : Lokshahi News

श्रीलंका दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय टीमचे मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी कौतुक केले आहे. आर्थरचा असा विश्वास आहे की सध्याची भारताची टीम आयपीएल ऑल स्टार्स इलेव्हनसारखी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिका १३ जुलैपासून सुरू होणार होती, परंतु श्रीलंकेच्या संघात कोरोनाचा शिरकाव झाल्याने या मालिकेचे वेळापत्रकात बदल करण्यात आले. ही मालिका आता १८ जुलैपासून खेळवली जाईल. दरम्यान या मालिकेसाठी भारताने तरुण खेळाडूंचा संघात भरणा केला आहे.

या संघाबाबत श्रीलंकेचे मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर म्हणतात, भारताची टीम आयपीएल ऑल स्टार्स इलेव्हनसारखी आहे. आगामी वनडे मालिकेत भारतीय संघाला हलक्यात घेणार नाही. दरम्यान श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगाने या दौर्‍यावरील भारतीय संघ हा दुय्यम दर्जाचा संघ असून या संघाबरोबर खेळणे हा श्रीलंकेच्या संघाचा अपमान आहे असे नुकतेच म्हटले होते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा