क्रीडा

आयपीएलचा एकही सामना खेळला नाही…चेन्नईने घेतले ताफ्यात

Published by : Lokshahi News

IPL 2021चा हंगाम काहीसा हटके असणार आहे. कारण या हंगामात नवीन टीम, दिग्गज खेळाडूंसह नवोदित खेळाडूंचा भरणा असणार आहे. मात्र या हंगामात एक असा भारताचा दिग्गज खेळाडू शामिल होणार आहे, ज्याने आतापर्यत एकही सामना खेळला नाही. या खेळाडूचे नाव आहे चेतेश्वर पुजारा.

IPLच्या लिलावात यंदा भारताचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा यानेही आपलं नाव नोंदवलं होतं. कसोटीपटू असा लौकिक असलेल्या चेतेश्वर पुजाराला विकत घेण्याचं धैर्य कोण दाखवणार अशी चर्चा होती. पण धोनीच्या चेन्नई संघानं त्याला आपल्या गोटात सामिल करुन घेतलं आहे. त्यामुळे पुजारा चेन्नईत दाखल होताच लिलावासाठी उपस्थित साऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

अनुभवी चेतेश्वर पुजाराला त्याच्या मूळ किंमतीमध्ये म्हणजेच ५० लाख रुपयांत चेन्नईनं आपल्या गोटात घेतलं. लिलावापूर्वी सोशल मीडियावर पुजाराला चेन्नई संघ घेण्यास इच्छुक असल्याची चर्चा होती. अखेर चेन्नईने अनुभवी पुजाराला संघात स्थान दिलं.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा