क्रीडा

ISSF Shooting World Cup नेमबाज राही सरनोबतची सुवर्ण कामगिरी

Published by : Lokshahi News

क्रोएशियाच्या ओसीजेकमध्ये सुरू असलेल्या नेमबाजी विश्वचषक २०२१ स्पर्धेत भारताच्या मराठमोठ्या नेमबाज राही सरनोबत हिनं सुवर्णपदकाची कमाई केली आहे. २५ मीटर एअर पिस्तल प्रकारात राहीनं ३९ गुणांसह अव्वल स्थान प्राप्त करत सुवर्णपदक जिंकलं. तर फ्रान्सच्या माथिल्डे लामोले हिनं ३१ गुणांसह रौप्य पदकाची कमाई केली. तर रशियाच्या विन्टालिना २८ गुणांसह कांस्य पदकाची मानकरी ठरली आहे. राहीनं आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करत जागतिक पातळीवर नेमबाजीच्या विश्वचषक स्पर्धेत आपली चुणूक पुन्हा एकदा दाखवून दिली. सुरुवातीपासूनच आघाडी घेत राहीनं अचूक लक्ष्यवेध घेत सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. तर दुसरीकडे भारताच्या मनु भाकर हिला ७ व्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Wadala Vitthal Mandir : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विठुरायाच्या चरणी नतमस्तक; प्रति पंढरपुरात पांडुरंगाची केली महापूजा

Latest Marathi News Update live : कोकण किनारपट्टीला आज ऑरेंज अलर्ट, ग्रामीण भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

Ashadi Ekadashi 2025 : शेतकरी, कष्टकरी, सर्व जनतेच्या सुख-समृद्धी व राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांची पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना

आजचा सुविचार