IND Vs ZIM Team Lokshahi
क्रीडा

चालू सामन्यात तिरंगा घेऊन जाणे पडले महाग, भरावा लागणार 'इतक्या' लाखांचा दंड

भारत विरुद्ध झिम्बाब्वे सामन्या दरम्यान घडला हा प्रकार

Published by : Team Lokshahi

IND vs ZIM: भारत विरुद्ध झिम्बाब्वे सामन्यादरम्यान एका भारतीय चाहत्याला तिरंगा घेऊन मैदानात घुसखोरी करणे महागात पडले आहे. त्याला 6.50 लाखांचा दंड भरावा लागणार आहे. ही घटना १७व्या षटकातील आहे. हार्दिक पंड्या जेव्हा पाचवा चेंडू टाकत होता तेव्हा हा मुलगा मैदानात तिरंगा घेऊन घुसला आणि थेट रोहित शर्मापर्यंत पोहोचला. तेव्हा तो मुलगा भावूक झाल्याचे यावेळी दिसले. हा प्रसंग सर्वांनीच आपल्या मोबाईलमध्ये यावेळी टिपला.

हा चाहता कोण होता, कुठे राहतो यासंबंधी अशी कुठलीही माहिती समोर आलेली नाही. भारताने झिम्बाब्वेचा 71 धावांनी पराभव केला. या सामन्यात हा प्रसंग घडला. सामना चालू असताना तो चाहता मैदानात घुसला तेव्हा मैदानावरील सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडून ओढत नेण्यास सुरुवात करताच रोहितने त्यांना आरामात बाहेर नेण्यास सांगितले. या घटनेमुळे काही काळ सामना थांबवण्यात आला होता. मैदानाच्या सुरक्षेत अडथळा आणल्याप्रकरणी एका तरुण चाहत्याला दंड ठोठावण्यात आला आहे. मात्र या दंडाची रक्कम ऐकून नागरिक चकित झाले आहे. यावरूनच सोशल मीडियावर चाहत्यांनी प्रश्न उपस्थित केला. 'तरुण एवढा मोठा दंड कसा भरणार?' असा प्रश्न अनेकांनी विचारला आहे.

आयसीसी अशा घटनांवर नजर ठेवते. BCCI पॅनेल पंच राजीव रिसोडकर यांनी स्पष्ट केले की, सुरक्षा तोडल्यास यजमान मैदानाला मायनस पॉइंट्स दिले जातात. सलग तीन घटनांनंतर त्या मैदानावर बंदी घालण्यात येते. आंतरराष्ट्रीय सामन्यांदरम्यान अशा घटना घडू नयेत, असे त्यांचे मत आहे. कारण अशा घटनांमुळे संपूर्ण स्पर्धेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. इंदूरच्या घटनेची आठवण करून देताना ते म्हणतात की, आम्हाला (एमपीसीए) बीसीसीआयलाही उत्तर द्यावे लागले होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

PM Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज वाढदिवस; डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन करुन दिल्या शुभेच्छा

Latest Marathi News Update live : आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

Kolhapur Ambabai Mandir : अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन आज बंद राहणार

Latest Marathi News Update live : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत, सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश