Jasprit Bumrah Team Lokshahi
क्रीडा

IND vs SL: जसप्रीत बुमराहचे तीन महिन्यांनंतर भारतीय संघात पुनरागमन

श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात बदल करण्यात आले आहेत. जसप्रीत बुमराहचे प्रदीर्घ कालावधीनंतर भारतीय संघात पुनरागमन झाले आहे.

Published by : shweta walge

श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात बदल करण्यात आले आहेत. जसप्रीत बुमराहचे प्रदीर्घ कालावधीनंतर भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. बुमराह दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर पडला होता. टी-२० विश्वचषकातही तो टीम इंडियाचा भाग नव्हता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महत्त्वाच्या कसोटी मालिकेपूर्वी बुमराहचा भारतीय संघात समावेश होणे भारतासाठी आनंदाची बातमी आहे.

पाठीच्या दुखापतीमुळे बुमराह सप्टेंबर 2022 पासून टीम इंडियातून बाहेर होता. दुखापतीतून सावरल्यानंतर तो बराच काळ क्रिकेटपासून दूर राहिला. जसप्रीत बुमराहला नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये सराव केल्यानंतर पूर्णपणे तंदुरुस्त घोषित करण्यात आले आहे. तो लवकरच भारतीय संघात सामील होणार आहे.

29 वर्षीय जसप्रीत बुमराहने 25 सप्टेंबर रोजी भारताकडून शेवटचा सामना खेळला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत तो भारतीय संघाचा भाग होता. त्याच वेळी त्याने 14 जुलै रोजी इंग्लंडविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला. बुमराहच्या आगमनाने भारतीय वेगवान गोलंदाजी मजबूत झाली आहे. T20 विश्वचषक 2022 दरम्यान, भारताला बुमराहची उणीव भासली आणि भारतीय गोलंदाज उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध एकही विकेट घेऊ शकले नाहीत.

वनडे मालिकेपूर्वी भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिकाही खेळणार आहे. या मालिकेत हार्दिक पांड्या टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. मात्र, बुमराह टी-20 मालिकेत खेळणार नाही.

श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : "कोण जैन लोक आहेत जी...", फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालासह अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू