क्रीडा

KKR VS RR: जोस बटलरची शतकी खेळी! राजस्थान रॉयल्सचा ईडन गार्डनवर दमदार विजय

Published by : Dhanshree Shintre

आयपीएल 2024चा 31वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात ईडन गार्डन्सवर खेळला गेला. राजस्थान रॉयल्सने शेवटच्या चेंडूवर सामना जिंकला. जोस बटलरने शतकासह संघाला सहावा विजय मिळवून दिला. राजस्थान 12 गुणांसह गुणतालिके अव्वल तर कोलकाता 8 गुणांसह दुसऱ्या स्थानावर कायम आहे. प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने राजस्थानसमोर 224 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सने 20 षटकांत 8 गडी गमावून 224 धावा केल्या आणि सामना 2 विकेट्सने जिंकला.

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या राजस्थान रॉयल्सने पहिली तीन षटके चांगली टाकली होती. मात्र त्यानंतर सलामीवीर सुनिल नारायण आणि अंगक्रिश रघुवंशीने धडाकेबाज फलंदाजी करत 10 षटकात केकेआरला शंभरी गाठून दिली. मात्र राजस्थान एका बाजूने केकेआरच्या विकेट्स घेतल होतं. दुसऱ्या बाजूनं सुनिल नारायण तडाखे देत होता.

अखेर त्याने 49 चेंडूत आपलं आयपीएलमधील पहिलं शतक ठोकलं. त्यानंतर त्याने 56 चेंडूत 109 धावा केल्या. तो बाद झाला त्यावेळी केकेआर 195 धावांपर्यंत पोहचवलं होतं, त्यानंतर रिंकू सिंहने शेवटच्या दोन षटकात रिंकू सिंहने फटकेबाजी करत 9 चेंडूत 20 धावा केल्या. यामुळे केकेआरने 20 षटकात 6 बाद 223 धावा केले.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग 11:

फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरीन, आंग्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा.

राजस्थान रॉयल्स प्लेइंग 11:

यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, कुलदीप सेन, युझवेंद्र चहल.

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

"देशभक्त शब्दावर आक्षेप घेणारे फडणवीस देशद्रोही आहेत"; उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्र्यांवर पलटवार