शुक्रवारी राष्ट्रपती भवनात राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळा पार पडला. ज्यामध्ये दुपारी राष्ट्रपती भवनात जगतातील काही नामवंत खेळाडूंचा राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दोन ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनू भाकर आणि जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन डी गुकेश यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केले.
या दोन्ही खेळाडूंना टाळ्यांच्या कडकडाटात हा सन्मान प्रदान करण्यात आला. मनू भाकरने ऑलिम्पिकमध्ये देशाला नाव लौकिक मिळवून दिला, तर डी गुकेशने नुकतेच बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद पटकावले. त्यामुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार देऊन या क्रिडारत्नांचा गौरव केला गेला.
पॅरिस ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता कुस्तीपटू अमन सेहरावत, नेमबाज स्वप्नील कुसाळे, सरबज्योत सिंग आणि पुरुष हॉकी संघाचे सदस्य हरमनप्रीत सिंग, सुखजीत सिंग, संजय आणि अभिषेक यांना अर्जुन पुरस्कार देऊन त्यांना सन्मान करण्यात आला.
तसेच अशा 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ज्यामध्ये 17 पॅरा ऍथलीट होते. या खेळाडूंनी त्यांच्या कठोर परिश्रम, समर्पण आणि संघर्षाने देशाचा गौरव केला आहे. या खेळाडूंच्या यशाने हे सिद्ध होते की, भारतीय क्रीडा संस्कृतीच्या मजबूत पायाचे प्रतीक हे खेळाडू आहे.