क्रीडा

महिलांमध्ये महाराष्ट्राला तर पुरुषांमध्ये रेल्वेला सुवर्णपदक

Published by : Lokshahi News

५४ वी राष्ट्रीय पुरुष-महिला अजिंक्यपद खो-खो स्पर्धा आज एमएलबी खेळ परिसर, राईट टाऊन, जबलपूर, मध्य प्रदेश येथे संपन्न झाली. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिलांनी सुवर्णपदक मिळवताना भारतीय विमान प्राधिकरणाला धूळ चारली. तर भारतीय रेल्वेने सुसाट खेळी करताना महाराष्ट्राच्या दुहेरी मुकूटाच्या हॅट्रिक मिळवण्याच्या स्वप्नांचा चुराडा केला. या स्पर्धेत महिलांमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूचा दिला जाणार्‍या राणी लक्ष्मीबाई पुरस्कारावर महाराष्ट्राची कर्णधार प्रियांका इंगळेने नाव कोरले. तर पुरुषांमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूचा दिला जाणार्‍या एकलव्य पुरस्कारावर रेल्वेच्या महेश शिंदेने नाव कोरले आहे. महिलांमध्ये महाराष्ट्राला २३ वे तर पुरुषांमध्ये रेल्वेला १० वे अजिंक्यपद मिळाले आहे. या वर्षीचे महाराष्ट्राचे हे पाचवे अजिंक्यपद आहे. सब जूनियर गटाचे दोन व जूनियर गटाचे दोन व खुल्या गटाचे एक अशी पाच अजिंक्यपद मिळाली आहेत.

महिलांच्या अंतिम सामान्यत महाराष्ट्राने भारतीय विमान प्राधिकरणाचा १३-११ (मध्यंतर ७-६) असा २ गुणांनी पराभव केला. महाराष्ट्राच्या प्रियांका इंगळे (कर्णधार) (१:३०, २:१० मि. संरक्षण व ३ बळी), रेश्मा राठोड (१:४०, २:०० मि. संरक्षण व २ बळी), अपेक्षा सुतार (१:३०, १:५० मि. संरक्षण व १ बळी), रुपाली बडे (१:२०, २:०० मि. संरक्षण), स्नेहल जाधव (१:५० मि. संरक्षण व १ बळी), पूजा फरगडे (३ बळी) यांनी चतुरस्त्र खेळी करताना महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले. विमान प्राधिकरणाच्या प्रियंका भोपी (२:००, २:२० मि. संरक्षण व ३ बळी), ऐश्वर्या (२:००, १:५० मि. संरक्षण) यांनी जोरदार लढत दिली मात्र त्या आपल्या संघाला परभवापासून वाचवू शकल्या नाहीत.

पुरुषांच्या अंतिम सामान्यत रेल्वेने महाराष्ट्राचा १४-१३ (मध्यंतर ८-७) असा १:४० मि. राखून एक गुणाने विजय मिळवला. खरतर सुसाट सुटलेल्या रेल्वेला रोखण्यात महाराष्ट्राचे पुरुष अपयशी ठरले. रेल्वेच्या महेश शिंदे (२:००, १:१० मि. संरक्षण व २ गडी), दिपेश मोरे (१:५०, १:१० मि. संरक्षण व २ गडी) व मिलिंद चावरेकर (१:३०, १:१० मि. संरक्षण व १ गडी) यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला. तर महाराष्ट्राच्या प्रतीक वाईकर (१:३०, १:०० मि. संरक्षण व १ गडी), सागर लेंगरे (१:४० मि. संरक्षण) व अक्षय भांगरे (१:१०, १:०० मि. संरक्षण व १ गडी) यांनी दिलेली लढत कमी पडल्यानेच रेल्वेला सुवर्णपदक मिळू शकले. तृतीय क्रमांकाच्या पुरुषांच्या सामन्यात कोल्हापूर तर महिलांच्या सामन्यात कर्नाटक विजयी ठरले तर दोन्ही गटात अनुक्रमे कर्नाटक व हरयाणा चौथ्या क्रमांकावर राहिले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा