KKR Vs. PBKS Team Lokshahi
क्रीडा

IPL 2022: आज कोलकाता विरूद्ध पंजाब सामना

Published by : Vikrant Shinde

यंदाच्या हंगामातील पहिलाच सामना कोलकाता विरूद्ध चेन्नई (KKR Vs. CSK) असा खेळवला होता. पहिल्याच सामन्यात चेन्नईवर विजय मिळवत कोलकात्याच्या संघाने हंगामात दणदणीत सुरूवात केली होती. मात्र, बंगळुरु संघाने कोलकात्याला 3 विकेट्सने (RCB Vs. KKR) मात दिली. तर, पंजाबचा (PBKS) यंदाच्या हंगामात अद्याप केवळ एकच सामना झाला आहे. त्या सामन्यात पंजाबने बंगळुरूच्या (PBKS Vs. RCB) संघाला 5 विकेट्स राखत हरवलं होतं. त्यामुळे, आजच्या सामन्यात दोन्ही संघ जिंकण्यासाठी पुर्ण प्रयत्न करतील हे नक्की.

पंजाबच्या संघाची ताकद काय?
पंजाबच्या संघाची सर्वात जमेची बाजू म्हणजे फलंदाजी आहे. मयांक व शिखर धवन (Mayank Agarwal & Shikhar Dhawan) ह्यांची सलामी जोडी जबरदस्त सुरूवात करून देण्यासाठी समर्थ आहे. तर, त्यानंतर जॉनी, भानुका, शाहरुख, लियाम सारखे सामर्थ्यवान फलंदाज आहेत. त्यामुळे पंजाबचे फलंदाज कोलकात्याच्या संघातील गोलंदाजांवर भारी पडण्यास सक्षम आहेत हे नक्की.

कोलकात्याच्या संघाची ताकद काय?
कोलकात्याच्या संघामध्ये सर्वात मोठी व महत्त्वाची जबाबदारी पार पाडतात ते म्हणजे अष्टपैलू खेळाडू (All Rounders). आंद्रे रसल (Andre Russel) सारखा स्फोटक अष्टपैलू खेळाडू समोरील संघातील खेळाडूंच्या मनात सहज धडकी भरवू शकतो. तर, वेंकटेश अय्यर(Venkatesh Iyer), सुनील नारायण, मोहम्मद नबी, सॅम बिलिंग्स हे सर्वच अष्टपैलू खेळाडू उत्तम खेळी करू शकतात हे ह्या सर्वांनी आधीही सिद्ध करून दाखवलं आहे.

त्यामुळे हे दोन्ही संघ अतिशय उत्तम कामगिरी करण्यासाठी सक्षम आहेत. दरम्यान आजच्या सामन्यात नक्की काय होणार हे तर सामना सुरू झाल्यावरच लक्षात येईल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : "कोण जैन लोक आहेत जी...", फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालासह अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू