आयपीलच्या 18 व्या सीझनला 22 मार्चपासून सुरुवात झाली. या सीझनसाठी भारतीय क्रिकेटपटू के-एल राहुलला दिल्ली कॅपिटल्सने मेगा ऑक्शनमध्ये 14 कोटी रुपयांना विकत घेतले. या सीझनमधील दिल्लीची पहिली मॅच 24 मार्चला झाली, त्यावेळेस के-एल राहुल मैदानात दिसला नाही. त्यामुळे अनेकांना धक्का बसला. मात्र त्याचवेळी राहुलच्या घरी चिमुकलीचे आगमन झाल्याची बातमी चाहत्यांना दिली होती. त्यामुळे अनुपस्थितीत होता.
आता पुन्हा के-एल राहुल मैदानावर पाहायला मिळणार आहे. दिल्लीचा पुढील सामना 30 मार्चला विशाखापट्टणमला होणार आहे. हा सामना दिल्ली कॅपिटल्स् विरुद्ध सनरायझर्स हैदाबाद होणार आहे. दिल्ली कॅपिटल्सने पहिला सामना शानदार नोंदवला होता. त्यावेळी अक्षर पटेल यांच्या नेतृत्त्वाखाली दिल्लीने पहिला सामना जिंकला होता.
के-एल राहुलच्या खेळाबद्दल सांगायचे झाले तर,
के-एल राहुलने 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामान्यात दिसला होता. भारत विरुद्ध न्युझीलंड या सामन्यात राहुलने 33 चेंडूत 34 धावा काढल्या होत्या. त्या सामन्यात भारताने न्युझीलंडवर 4 धावांनी विजय मिळवला होता. तसेच राहूल आयपीएल 2024 पासून एकही टी-20 सामना खेळाला नाही.