क्रीडा

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या पूर्णाकृती पुतळ्याचं वानखेडेवर होणार अनावरण!

सचिन तेंडुलकर याचा मुंबईमधील वानखेडे मैदानावर मोठ 22 फुटी पुतळा उभारण्यात येणार आहे. सचिनसाठी मोठी गोष्ट असणार असून ज्या मैदानात त्याने अखेरचा सामना खेळला त्याच ठिकणी हा पुतळा बसवण्यात येणार आहे.

Published by : Team Lokshahi

मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) 1 नोव्हेंबरला सचिनचं होम ग्राउंड वानखेडे स्टेडियमवर क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार आहे. आपल्या नावावर अनेक विक्रम असलेल्या सचिनसाठी त्याच्या कारकिर्दीतलं वानखेडे स्टेडियम एक महत्वाचं मैदान आहे. क्रिकेट विश्वचषकातील भारत-श्रीलंका सामन्याच्या पूर्वसंध्येला 200 कसोटी सामने खेळणाऱ्या 50 वर्षीय तेंडुलकरच्या पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे 15821 कसोटी धावा आणि तब्बल 18426 एकदिवसीय धावा करणारा 'भारतरत्न' सचिन तेंडुलकर या सोहळ्यासाठी स्वतः उपस्थित राहणार आहे.

अनेक राजकीय नेते, माजी खेळाडू राहणार उपस्थितः या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रमुख पाहुणे असतील तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि बीसीसीआयचे कोषाध्यक्ष आशिष शेलार उपस्थित राहणार आहेत. तसंच या सोहळ्याला अनेक माजी क्रिकेटपटू उपस्थित राहण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियन दिग्गज दिवंगत शेन वॉर्नच्या चेंडूवर सरळ षटकार मारणारा सचिन तेंडुलकरचा 22 फुटांचा पुतळा प्रसिद्ध चित्रकार-शिल्पकार प्रमोद काळे यांनी बनवला असून बुधवारी तो लोकांसाठी खुला करण्यात येणार आहे. एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे यांनी याबाबतची कल्पना मांडली होती.

दरम्यान, वानखेडे मैदानावरच 2011 साली वन डे मधील दुसरा वर्ल्ड कप जिंकला होता. सचिनला त्यावेळी खेळाडूंनी खांद्यावर घेत संपूर्ण मैदानात फेरी मारली होती. धोनीने शेवटच्या बॉलवर मारलेला सिक्सर आणि त्यावेळी रवी शास्त्री यांनी केलेले कॉमेट्री सर्व भारतीयांच्या मनात घर करून राहिली आहे. त्याच मैदानावर सचिनचा पुतळा बसवण्यात येत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pratap Sarnaik : 'अमराठींसाठी मोफत मराठी शिकवणी', मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

Amravati News : अंधश्रद्धेचा कहर! 10 दिवसांच्या चिमुकल्याला गरम विळ्याचे 39 चटके अन्...

Banner In Front Of Sena Bhavan : विजयी मेळाव्यानंतर सेना भवनासमोर झळकले ठाकरे कुटुंबातील दोन पिढ्यांच्या फोटोचे बॅनर

Baramati Malegaon Election : माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अजित पवार, उपाध्यक्षपदी कोणाची निवड? जाणून घ्या...