क्रीडा

Asian Games 2023: कबड्डीमध्ये पुरुषांची सुवर्णकामगिरी, इराणला पराभूत करत भारताने रचला इतिहास

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय कबड्डी संघाने अंतिम फेरीत इराणचा पराभव करत सुवर्णपदक जिंकले आहे.

Published by : shweta walge

चीनमध्ये सुरु असेलल्या १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष कबड्डी संघाने अंतिम फेरीत इराणचा पराभव करत सुवर्णपदक जिंकले आहे. भारताने अंतिम सामन्यात इराणचा 33-29 असा पराभव करत ऐतिहासिक कामगिरी केली.

या सामन्यात काहीसा वाद झाला त्यामुळे सामन्याला देखील विलंब झाला. मात्र शेवटी निर्णय हा भारताच्या बाजूने देण्यात आला. तासाभराच्या वादानंतर शेवटी खेळ पुन्हा सुरु करण्यात आला आणि भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्णपदकाची भर पडलीये. हा सामना जिंकून यंदाचा आशिया स्पर्धांमधील कबड्डीचा किताब हा भारताने गतविजेत्या इराणचा पराभव करुन आपल्या नावावर करुन घेतला आहे. 

भारताने गाठला 104 पदकांचा टप्पा

भारताच्या खेळाडूंनी आशियाई स्पर्धांमध्ये आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आतापर्यंत भारताच्या खात्यामध्ये 104 पदकं सामील झाली आहेत. यामध्ये 28 सुवर्ण, 35 रौप्य आणि 41 कांस्य पदकांचा समावेश आहे.पदकतालिकेत भारत चौथ्या स्थानावर कायम असून आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने 100 पदकांचा टप्पा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा