क्रीडा

Arjun Puraskar 2023: मोहम्मद शमीसह 26 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार घोषित

मोहम्मद शमीसह 26 खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर दोन बॅडमिंटनपटूंना खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : 2023 सालचे भारतीय क्रीडा पुरस्कार जाहीर झाले आहेत. क्रीडा क्षेत्रातील मोठा पुरस्कार 'खेलरत्न'साठी दोन बॅडमिंटनपटूंची निवड करण्यात आली आहे. सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी हे खेलरत्न पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. त्याचबरोबर मोहम्मद शमीला 'अर्जुन पुरस्कार' प्रदान करण्यात येणार आहे.

सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी बॅडमिंटनच्या क्षेत्रात भारताचा झेंडा जगभर फडकवला होता. या जोडीने हँगझोऊ येथे खेळल्या गेलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. दुसरीकडे, मोहम्मद शमीने २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती. या विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारा तो गोलंदाज होता.

या दोन मोठ्या भारतीय क्रीडा पुरस्कारांसाठी तिरंदाजी, बॉक्सिंग, कुस्तीपासून पॅरा तिरंदाजी आणि अंध क्रिकेट या 19 विविध खेळांमधील एकूण 28 खेळाडूंची नावे जाहिर झाली आहेत. दरम्यान, राष्ट्रपती भवनात 9 जानेवारी 2024 रोजी कार्यक्रमात खेळाडूंना हे क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

खेलरत्न पुरस्कार : चिराग शेट्टी (बॅडमिंटन) आणि सात्विकसाईराज रँकी रेड्डी (बॅडमिंटन)

अर्जुन पुरस्कार : ओजस प्रवीण देवतळे (तिरंदाजी), आदिती गोपीचंद स्वामी (तिरंदाजी), श्रीशंकर (अ‍ॅथलेटिक्स), पारुल चौधरी (अ‍ॅथलेटिक्स), मोहम्मद हुसामुद्दीन (बॉक्सर), आर वैशाली (बुद्धिबळ), मोहम्मद शमी (क्रिकेट), अनुष अग्रवाल (अश्वशक्ति), दिव्यकृती सिंग (अश्वस्वार ड्रेसेज), दीक्षा डागर (गोल्फ), कृष्णा बहादूर पाठक (हॉकी), सुशीला चानू (हॉकी), पवन कुमार (कबड्डी), रितू नेगी (कबड्डी), नसरीन (खो-खो), पिंकी (लॉन बॉल), ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर (शूटिंग), ईशा सिंग (नेमबाजी), हरिंदर पाल सिंग (स्क्वॉश), अहिका मुखर्जी (टेबल टेनिस), सुनील कुमार (कुस्ती), अनंत (कुस्ती), रोशिबिना देवी (वुशू), शीतल देवी (पॅरा तिरंदाजी), अजय कुमार (अंध क्रिकेट), प्राची यादव ( पॅरा कॅनोइंग)

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा