एकीकडे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतचा थरार पाहायला मिळत आहे अशातच भारतात सैयद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 स्पर्धेत भारताचे खेळाडू आपला जलवा दाखवताना दिसून येत आहेत. तर युवा खेळाडूंसह भारताचे काही जुने मुरलेले खेळाडू देखील संघात कमबॅक करताना दिसत आहेत. असं असताना आपल्या चाबूक गोलंदाजीसह फलंदाजांसाठी कर्दनकाळ समजला जाणारा मोहम्मद शमी यावेळी फलंदाजीत धुमाकूळ घालत आहे.
या स्पर्धेतील प्री क्वार्टर फायनलचा सामना बंगाल आणि चंडीगड या दोन्ही संघांमध्ये सुरु असताना चंडीगड संघाने नाणेफेक जिंकून बंगालला प्रथम फलंदाजी करण्याचं आव्हान दिलं आणि यादरम्यान बंगालला चांगली सुरुवात करता आली नाही. चंडीगडला हा सामना जिंकण्यासाठी 160 धावांची गरज होती.
यावेळी सामन्यात करन लालने 33 त्याचसोबत शाकीर गांधीने 10 तर ह्रित्विक चॅटर्जीने 28 तसेच प्रदिप्ता प्रमाणिकाने 30 आणि अखेर शमीने 32 धावांसह खेळी खेळली. शामी हा उत्कृष्ट गोलंदाज आहे आणि यावेळी त्याने फलंदाजीमध्ये आपल नाव वर आणल आहे. या सामन्या दरम्यान शामी 10 व्या क्रमांकावर फलंदाजीला आला. 17 बॉलचा सामना करत 188.24 च्या स्ट्राईक रेटसह 32 धावांची खेळी खेळली. त्याने 4,4,4,6,6 असे पावरफुल हिटींग केली आणि 159 धावा करत शमीने संघाला दमदार शेवट करुन दिला.