RCB Vs Kochi  
क्रीडा

'या' सामन्यात टाकली गेली होती आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडी ओवर...

Published by : Saurabh Gondhali

मुंबई विरूद्ध कोलकत्ताच्या सामन्यात एका ओव्हरमध्ये पॅट कमिन्सने तब्बल 35 धावा चोपल्या होत्या. यानंतर आयपीएलमध्ये सर्वात महागडी ओव्हर कधी टाकण्यात आली असा प्रश्न समोर येत होता.याचेच उत्तर आपण या बातमीत पाहणार आहोत.

आयपीएलच्या इतिहासामध्ये सर्वात महागडी वर 2011 मध्ये टाकण्यात आली होती. कोची टस्कर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या दोन संघांमध्ये हा सामना होता. यामध्ये एका ओव्हरमध्ये तब्बल 37 रन्स काढण्यात आले होते. आणि हा भीम पराक्रम केला होता ख्रिस गेल (Chris Gayle) याने. त्याने प्रशांत परमेश्वरन या बॉलरच्या ओव्हरमध्ये हे रन्स काढले होते. यानंतर आयपीएल 2021 मध्ये रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांनी एका ओव्हरमध्ये 36 रन्स काढले होते. हा सामना होता चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Banglore) रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांनी हे रन्स हर्षद पटेल (Harshad Patel) याच्या ओव्हरमध्ये काढले होते. त्याने या ओव्हरमध्ये पाच सिक्स व एक फोर लगावला होता. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) या संघाने रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) च्या 28 बॉल मध्ये 62 रमेश च्या जोरावर 191 पर्यंत मजल मारली होती.

यानंतर आत्तापर्यंतची तिसरी सगळ्यात महागडी ओवर म्हणजे 2014 साली सुरेश रैना (Suresh Raina) ह्याने चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) कडून खेळताना पंजाबच्या संघाच्या विरुद्ध एकावर मध्ये 33 रन्स काढले होते. त्याने हे रन्स परविंदर अवाना याच्याविरुद्ध काढले होते. परंतु हा सामना चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) या संघाला गमवावा लागला होता.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मुंबई वेगळं करण्याचा प्रयत्न हाणून पाडला - राज ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्यावर मराठी कलाकारांची भावनिक प्रतिक्रिया

Raj Thackeray - Uddhav Thackeray : मेळाव्यासाठी अभूतपूर्व गर्दी, पूर्ण क्षमतेने भरला वरळी डोम; राज - उद्धव यांना ऐकण्यास कार्यकर्ते उत्सुक

Chandu Mama on Raj- Uddhav Thackeray : उद्धव-राज ठाकरे एकत्र! चंदू मामा वैद्य यांच्या प्रयत्नांना यश