Punit Balan & Ankita Raina
Punit Balan & Ankita Raina Team Lokshahi
क्रीडा

टेनिसपटू अंकिता रैना आणि पुनीत बालन ग्रुपमध्ये सामंजस्य करार

Published by : Vikrant Shinde

चंद्रशेखर भांगे | पुणे: सन २०१६ च्या दक्षिण आशियाई टेनिस स्पर्धेत एकेरी व मिश्र दुहेरी अशा दोन्ही गटात सुवर्णपदक पटकावणाऱ्या अंकिता रैना व पुनीत बालन ग्रुप यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला असल्याची माहिती उद्योजक पुनीत बालन यांनी दिली.

मूळ काश्मीरी पंडित असणाऱ्या अंकिताचा जन्म गुजरातमध्ये झाला. मोठा भाऊ अंकित रैनाला टेनिस खेळाताना पाहून अंकिता प्रभावित झाली आणि पुण्यातील पीवायसी येथे प्रशिक्षक हेमंत कोद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सरावाला सुरुवात केली. कामगिरीचा आलेख सातत्याने उंचावताना अंकिताने अनेक शालेय तसेच विभागीय स्पर्धांमध्ये आपले वर्चस्व गाजविले.

आयटीएफ सर्किट स्पर्धेत खेळताना अंकिताने तब्बल ११ एकेरीत तर १८ मिश्र दुहेरीत विजेतेपदे पटकावली आहेत. सन २०१८ मध्ये अंकिताने आशियाई स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली. यापूर्वी केवळ भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाने या स्पर्धेत पदक कमावले होते. त्याच वर्षी झालेल्या $25K स्पर्धेत विजेतेपद मिळवताना आंतर राष्ट्रीय रँकींगमध्ये १८१ वे स्थान पटकावले.

सन २०२१ सालच्या फिलिप आयलंड चषक स्पर्धेत पहिली डब्यूटीए सिंगल सामन्यात विजेतेपद पटकावले. या लढतीत अंकिताने इटलीच्या एलिसाबेटा कोकियारेटोला पराभूत करताना इतिहासात नाव कोरले.

"अंकिता सारखे खेळाडू भारताचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकावत असतात. अशा प्रतिभावान खेळाडूंशी जोडलो गेल्याचा आनंद होत आहे. उद्या याच खेळाडूंकडून प्रेरणा घेऊन नवीन खेळाडू तयार होतील आणि राज्याचं आणि देशाचं नाव उंचावतील, असा विश्वास आहे". अशी प्रतिक्रिया पुनीत बालन यांनी दिली आहे.

"पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणाऱ्या उबाठाच्या उमेदवारांवर कारवाई करा"; किरण पावसकरांचा ठाकरेंवर हल्लाबोल

IPL 2024 : आरसीबीने CSK विरोधात रचला इतिहास; टी-२० क्रिकेटमध्ये 'हा' कारनामा करणारा ठरला पहिला संघ

"लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांमध्ये महाविकास आघाडीनेच बाजी मारलीय"; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा मोठा दावा

"एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायला तयार होतो"; शरद पवारांच्या विधानाला संजय राऊतांनी दिलं रोखठोक प्रत्युत्तर, म्हणाले...

Patanjali: बाबा रामदेव पुन्हा अडचणीत; पतंजलीवर मोठी कारवाई