Yavatmal girl died due to no ventilator
Yavatmal girl died due to no ventilatorTeam Lokshahi

यवतमाळमधील तरुणीचा व्हेंटिलेटरअभावी मृत्यू; लोकशाहीच्या बातमीनं व्यवस्थेला आली जाग...

या सर्व प्रकाराबद्दल लोकशाहीने स्थानिक प्रशासनासह लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारले
Published by :
Vikrant Shinde

कल्पना नळसकर | नागपूर: काल यवतमाळमधील आर्णी तालुक्यातील एका युवतीचा नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये व्हेंटिलेटरअभावी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. अंबु बॅगद्वारे कृत्रिम श्वास पुरवठा करून तिला जगवण्यासाठी पालकांनी 24 तास आटापिटा केला. परंतु, त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही. अखेर मुलीने व्हेंटिलेटर अभावी अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे नागपूरच्या मेडिकल कॉलेजमधील ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला.

लोकशाहीने केला पाठपूरावा:

ही बातमी लोकशाहीला समजताच लोकशाहीने या घटनेला वाचा फोडली. हा सर्व प्रकार काय आहे हे समजून घेताना नागरिकांशी संवाद साधला असता, या हॉस्पिटलमध्ये वशिला लावल्याशिवाय सर्वसामान्यांना उपचार मिळत नाहीत असं समजलं. या सर्व प्रकाराबद्दल लोकशाहीने स्थानिक प्रशासनासह लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारले. त्यानंतर आता या सर्व प्रकरणाबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत.

Yavatmal girl died due to no ventilator
Video: राज ठाकरे सुरक्षा रक्षकांच्या श्वानाला कुरवाळतानाचा क्षण!

कोणी व काय दिले आहेत आदेश?

  • डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी दिले चौकशीचे आदेश

  • डॉक्टर सुधीर गुप्तांकडून चौकशी समिती गठीत

  • 5 सदस्यीस समिती करणार अहवाल सादर

  • पुढील 3 दिवसांत करणार अहवाल सादर

  • दोषींवर नियमांनुसार कारवाई करणार

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com