क्रीडा

IPL 2024 MI VS GT: पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सचा 6 धावांनी पराभव

Published by : Dhanshree Shintre

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 चा पाचवा सामना रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील हा सामना अतिशय रोमांचक होता. यात शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात संघानं 6 धावांनी विजय मिळवला. 169 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला 9 गड्यांच्या मोबदल्यात 162 धावाच करता आल्या. संघासाठी युवा खेळाडू डिवाल्ड ब्रेविसनं सर्वाधिक 46 धावांची खेळी केली तर रोहित शर्मानंही 43 धावांची खेळी केली. तिलक वर्मानंही 25 धावांच योगदान दिलं. मात्र यांची खेळी संघाला विजय मिळुवन देऊ शकली नाही. विशेष म्हणजे मुंबईचा संघ सलग 12 व्यांदा हंगामातील पहिल्या सामन्यात पराभूत झाला आहे. त्यांनी 2012 च्या आयपीएलमध्ये आपला पहिला सामना जिंकून हंगामाची विजयी सुरुवात केली होती.

या सामन्यात मुंबई इंडियन्सने टॉस जिंकुन प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे गुजरातचा संघ फलंदाजीला उतरला. रिद्धिमान साहा आणि शुभमन गिल या दोघांनी 31 धावांची सलामी दिली. मात्र चौथ्या ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहने साहाला बोल्ड केले. त्याने 19 धावा केल्या. त्यानंतर कर्णधार शुभमन गिलला पियुष चावला आऊट केले. त्याने 22 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकारासह 31 धावा केल्या.

साई सुदर्शननं संघाकडून सर्वाधिक 45 धावा केल्या. याशिवाय गिलनं 31 धावा केल्या. तर मुंबईकडून जसप्रीत बुमराहने 14 धावांत 3 बळी घेतले. जेराल्ड कोएत्झीला 2 आणि पियुष चावलाला 1 बळी मिळाला. गुजरात संघानं 31 धावांवर पहिली विकेट गमावली. जसप्रीत बुमराहनं रिद्धिमान साहाला (19) क्लीन बोल्ड केलं. यानंतर 62 धावांवर शुभमन गिलच्या (31) रुपानं संघानं दुसरी विकेट गमावली. या मोसमातील दोन्ही संघाचा पहिलाच सामना होता, ज्यामध्ये गुजरातने विजयासह आपलं खातं उघडलं, तर मुंबईचा पराभव झाला.

Daily Horoscope 16 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांना नोकरी-व्यवसायात मिळणार लाभ; पाहा तुमचे भविष्य

"काँग्रेस फक्त हिंदू-मुस्लिमांचं राजकारण करतं"; कल्याणच्या सभेत PM मोदींची तोफ धडाडली

दिनविशेष 16 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

महायुतीचे उमेदवार नारायण राणेंना मतदान करण्यासाठी पैसे वाटप...

HBD Vicky Kaushal: विकी कौशलकडे आहेत 'या' आलिशान गाड्या...