मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर IPL 2025 मधील 20 वा सामना आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. आरसीबीने एमआयसमोर 222 धावांचे लक्ष्य ठेवले होते. आरसीबीने 20 षटकात 5 विकेट गमावत 221 धावा केल्या. बंगळुरूकडून स्टार फलंदाज विराट कोहलीने सर्वाधिक धावा केल्या.त्याने 42 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 67 धावांची खेळी केली. मुंबईतर्फे ट्रेंट बोल्ट आणि कर्णधार हार्दिक पंड्याने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. दरम्यान आरसीबीने मुंबईवर 12 धावांनी विजयाचा झेंडा फडकावला आहे. कृणालने 20 व्या षटकात 19 धावा केल्या. त्याने केवळ 6 धावा दिल्या आणि तीन विकेट घेतल्या.
नाणेफेक गमावल्यानंतर आरसीबी फलंदाजीला आला आणि सुरुवात चांगली झाली नाही. बोल्टने पहिल्याच षटकात फिल सॉल्टला बोल्ड केले. यानंतर कोहलीने देवदत्त पडिक्कल 22 चेंडूत 37 धावा केल्या. दुसऱ्या विकेटसाठी दोघांनी 91 धावांची भागीदारी केली. कोहलीने कर्णधार रजत पाटीदारसोबत तिसऱ्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी केली. तसेच हार्दिकने 15 व्या षटकात कोहली आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांना बाद केले. अशा परिस्थितीत जितेश शर्मा यांच्यासोबत पाटीदारने आघाडी घेतली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 69 धावा केल्या आणि आरसीबीला 200 च्या पुढे नेले. पाटीदारने 32 चेंडूत 64 धावा केल्या.
मुंबईसमोर 222 धावांचे लक्ष्य ठेवले गेले. बुमराहने 20व्या षटकात 8 धावा दिल्या. जितेश 20 आणि टीम डेव्हिडने 1 धावा करून नाबाद राहिला.लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन आले आहेत. भुवनेश्वरने पहिल्याच षटकात १३ धावा दिल्या. रोहितने चौथ्या चेंडूवर षटकार तर शेवटच्या चेंडूवर रिकेल्टनने चौकार मारला. मुंबई इन्डियन्सची पहिली विकेट रोहित शर्माची पडली.
तिलक वर्मानेदेखील चांगली खेळी खेळली. त्याने 29 चेंडूमध्ये 56 रन्सची भागीदारी केली. त्यानंतर भुवनेश्वरने त्याची विकेट घेतली.