क्रीडा

DK च्या नावाने चिडवलं; मुरली विजयने स्टँडमध्ये घुसून प्रेक्षकांना धुतले

मैदानावर Murli Vijay येताच प्रेक्षकांची दिनेश कार्तिकच्या नावावरुन चिडवण्यास सुरुवात

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : तामिळनाडू प्रीमिअर लीग (Tamil Nadu Premier League) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 24 जुलै रोजी झालेल्या एका सामनादरम्यान क्रिकेटर मुरली विजय (Murali Vijay) प्रेक्षकांसोबत भिडला. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

तामिळनाडू प्रीमिअर लीगमध्ये 24 जुलै रोजी मदुराई पँथर्स व रुबी त्रिची वॉरियर्स यांच्यामध्ये सामाना रंगला होता. यामध्ये मदुराई पँथर्सने रुबी त्रिची वॉरियर्सचा 36 धावांनी पराभव केला. परंतु, या सामन्यात झालेल्या वादामुळे ही लीग चर्चेत आली आहे. मुरली विजयचा प्लेइंग इलेव्हनचा समावेश नव्हता. परंतु, तो काही काळासाठी मैदानात फिल्डींगसाठी उतरला होता.

मैदानावर मुरली विजय येताच प्रेक्षकांनी दिनेश कार्तिकच्या नावावरुन चिडवण्यास सुरुवात केली. पहिले मुरली विजयने प्रेक्षकांना शांत राहण्याची विनंती केली. परंतु, प्रेक्षकांनी डीकेचा जप सुरुच ठेवल्याने अखेर मुरली विजयने प्रेक्षक स्टॅण्डमध्ये घुसून भिडला. मात्र, तेवढ्यात सुरक्षारक्षक तात्काळ तिथे आल्याने तो पुन्हा मैदानात परतला. हा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

दरम्यान, दिनेश कार्तिक आणि मुरली विजय जीवाभावाचे मित्र होते. दोघेही देशांतर्गत ते आंतरराष्ट्रीय स्तरावर एकत्र खेळले. परंतु, दिनेश कार्तिकच्या पत्नी निकितासोबतची मुरली विजय जवळीक वाढली. व दिनेश कार्तिक आणि मुरली विजय यांच्या नात्यात कटुता निर्माण झाली. तर, दिनेश कार्तिकने पत्नीला घटस्फोट दिला. यानंतर मुरली विजय निकीतासोबत लग्न केले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा