क्रीडा

नीरज चोप्राचा फॉर्म कायम! फिनलॅण्डमध्ये कुओर्ताने स्पर्धेत मिळवलं सुवर्णपदक

Neeraj Chopra : स्पर्धेत 86.89 मीटर लांब भाला फेकत सुवर्णपदकावर कोरलं नाव

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) सुवर्णपदक मिळवणाऱ्या नीरज चोप्राने (Neeraj Chopra) त्याचा भन्नाट फॉर्म कायम ठेवला आहे. नीरज चोप्राने पुन्हा एकदा सुवर्णपदाकाला (Gold Medal) गवसणी घातली आहे. फिनलँड येथील कुओर्ताने (Kuortane Games) स्पर्धेत नीरज चोप्राने या स्पर्धेत 86.89 मीटर लांब भाला फेकत सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे.

फिनलँड येथील कुओर्ताने स्पर्धेत नीरज चोप्राने त्रिनिदाद अँड टोबॅगोच्या माजी ऑलिम्पिक विजेत्या केशॉर्न वॉलकॉट आणि ग्रनाडाच्या पीटर्स यांचा पराभव करत सुवर्णपदाकाला गवसणी घातली आहे. केशॉर्न वॉलकॉट ८६.६४ मीटर आणि ग्रनाडाच्या पीटर्स ८४.७४ मीटर भालाफेक करत यांना अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात ८६.६९ मीटरपर्यंत भाला फेकला. तर इतर दोन थ्रो फाऊल देण्यात आले. तिसऱ्या थ्रोवेळी नीरज चोप्राचा पाय घसरला व तो पडला. परंतु, नीरज पुन्हा उठून उभा राहीला. पण, यानंतर त्याने रिस्क न घेता उर्वरित दोन प्रयत्न टाळले.

दरम्यान, या स्पर्धेमधील कामगिरीमुळे स्टॉकहोम येथे ३० जूनला होणाऱ्या डायमंड लीगबाबत नीरज चोप्राकडून देशाच्या आशा उंचावल्या आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : मराठीच्या वाकड्यात जाणाऱ्यांवर राज ठाकरे कडाडले, जाणून घ्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

Chandrashekhar Bawankule On Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "खरा अजेंडा ‘म’ म्हणजे ‘मराठी’ नाही, तर..." ; विजय मेळाव्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया

Sanjay Rauat : "हे सरकार म्हणजे हवा भरलेले फुगे"; विजयी मेळाव्यानंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया

Uddhav Thackeray on Devendra Fadanvis : आंतरपाट दूर करणारे अनाजी पंत म्हणत उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर थेट निशाणा