T20 World Cup 2022
T20 World Cup 2022 Team Lokshahi
क्रीडा

पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडचा ऑस्ट्रेलियावर मोठ्या फरकांनी विजय

Published by : shamal ghanekar

सध्या टी-20 विश्वचषकाची सर्वत्र हवा सुरू आहे. या विश्वचषकाची आज सुरवात झाली आहे. आज पहिला सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात पार पडला. हा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (Sydney Cricket Ground) खेळला गेला. या सामन्यामध्ये न्यूझीलंड संघाने ऑस्ट्रेलियाला आपल्याच भूमीत 89 धावांनी हरवून दणदणीत विजय मिळवला आहे. यावेळी न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करून ऑस्ट्रेलियासमोर 201 धावांचं लक्ष्य ठेवलं होते. त्यानंतर प्रत्त्युत्तर देण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला फक्त 111 धावांपर्यंत पोचता आले आहे.

न्यूझीलंडचा सलामीवीर डेवॉन कॉनवॉयच्या नाबाद 92 धावांच्या चांगल्या खेळीने न्यूझीलंड संघाने 20 षटकात 3 बाद 200 धावा केल्या. तसेच त्याला साथ देण्यासाठी उतरलेला जेमी नीशमने 13 चेंडूत 26 धावा केल्या. तसेच ऑस्ट्रेलिया संघाकडून हेजलवूडने 2 तर झाम्पाने 1 विकेट घेण्यात यश मिळाले.

तसेच ऑस्ट्रेलिया संघाचे 50 धावा 4 फलंदाज बाद झाले. टीम डेव्हिड 11 तर पॅट कमिन्स 21 आणि मॅक्सवेल देखील 20 चेंडूत 28 धावा करण्यात यश मिळाले.

ऑस्ट्रेलिया विरूद्ध न्यूझीलंड या सामन्यामधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ ग्लेनने पकडलेल्या झेलचा आहे. आणि हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. ग्लेनने हवेत उडी घेऊन हा झेल पकडल्याने चाहते खूप खूश झाले आहेत. ग्लेनने पकडलेला हा झेल पाहून चाहते त्याला सुपरमॅन म्हणताना दिसत आहेत.

"मोदीजी पोलीस बाजूला ठेऊन जनतेत येऊन दाखवा", उद्धव ठाकरेंचा PM नरेंद्र मोदींना इशारा

"मुंबई-ठाण्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये वाघाची डरकाळी फुटली"; पदाधिकारी मेळाव्यात CM शिंदेंचं मोठं विधान

Skin Care: उन्हाळ्यात चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या...

Mother's Day 2024: मातृदिनाला आईसोबत नक्की भेट द्या 'या' धार्मिक स्थळांना

Daily Horoscope 11 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांच्या संपत्तीत होईल भरभराट; पाहा तुमचे भविष्य