न्यूझीलंडने पाकिस्तान दौर्यातून माघार घेतली आहे. पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणेवर विश्वास नसल्याने शेवटच्या क्षणी न्यूझीलंडच्या संघाची मालिकेतून माघार घेतली.
न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघात तीन एकदिवसीय आणि पाच टी २० सामन्यांची मालिका खेळली जाणार होती.न्यूझीलंड क्रिकेट संघ तब्बल १८ वर्षानंतर पाकिस्तानात क्रिकेट सामने खेळणार होता. मात्र पुन्हा एकदा सुरक्षेचं कारण देत दौरा स्थगित केल्याचं न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे.
न्यूझीलंड संघाशी निगडीत सुरक्षेबाबत इंटेलिजेंस अलर्ट मिळाला होता. आता न्यूझीलंड संघाला लवकरात लवकर पाकिस्तानातून बाहेर काढण्याची तयारी सुरु झाली आहे.