क्रीडा

IPL 2024 : धोनी नव्हे, आता ऋतुराज गायकवाड करणार चेन्नई सुपर किंग्जचं नेतृत्व

Published by : Dhanshree Shintre

आयपीएल सुरु होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जने संघात मोठे बदल केले आहेत. एमएस धोनीच्या जागी आता ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्जचा नवा कर्णधार असणार आहे. याबाबत आयपीएलच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर माहिती देण्यात आहे. यापूर्वी, एमएस धोनीने आयपीएल 2022 पूर्वी CSKचे कर्णधारपद सोडले होते, परंतु संघाच्या नेतृत्व करण्यासाठी धोनीला संघ व्यवस्थापनाकडून धोनीची कर्णधारपदी पुन्हा वर्णी लागली.

चेन्नई सुपर किंग्जने धोनीच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत पाचवेळा जेतेपद पटकावलं आहेत. गेल्या सीझनमध्ये चेन्नई सुपर किंग्जने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सचा पराभव करून पाचव्यांदा विजेतेपद पटकावले होते. मात्र आयपीएल सीझन सुरू होण्याच्या काही तासांपूर्वीच त्याने चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. CSK साठी पाच वेळा IPLचे विजेतेपद पटकावणारा महेंद्रसिंग धोनी यंदाच्या सीझनमध्ये संघाचे नेतृत्व करताना दिसणार नाही.

धोनीने ही जबाबदारी झटकण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी आयपीएल 2022 मध्येही संघ व्यवस्थापनाने कर्णधारपदात बदल केले होते. धोनीच्या जागी स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला कर्णधार बनवण्यात आले होते. मात्र, तो ही जबाबदारी नीटपणे पार पाडू शकला नाही. त्यामुळे त्याने आयपीएल सीझनच्या मध्यातच संघ सोडला आणि कर्णधारपदाचाही राजीनामा दिला. यानंतर धोनीने पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा सांभाळली.

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...