क्रीडा

अफगाणिस्तानकडून भारताला 273 धावांचे लक्ष्य, बुमराहने घेतल्या 4 विकेट

वर्ल्डकप 2023 चा भारत विरुध्द अफगाणिस्तान सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जात आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : वर्ल्डकप 2023 चा भारत विरुध्द अफगाणिस्तान सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जात आहे. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करत भारताला 273 धावांचे आव्हान दिले आहे. यात अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदीन 8 चौकार आणि 1 षटकार सामील होते. याशिवाय जसप्रीत बुमराहने भारताकडून सर्वाधिक 4 बळी घेतले.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या अफगाण संघाची सुरुवात विशेष झाली नाही. जसप्रीत बुमराहने बाद झालेल्या 7व्या षटकात 32 धावांवर इब्राहिम जरदान (21) याच्या रूपाने संघाने पहिली विकेट गमावली. कर्णधार हशमतुल्ला शाहिदी आणि अजमतुल्ला उमरझाई याच्या शानदार खेळीमुळे संघाला चांगली धावसंख्या गाठण्यात यश आले. यानंतर 43व्या षटकात 225 धावांवर कुलदीप यादवने कर्णधार अजमतुल्ला ओमरझाईला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4 बळी घेतले. याशिवाय हार्दिक पांड्याने 7 षटकात 43 धावा देत 2 बळी घेतले. शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव यांनाही प्रत्येकी 1 यश मिळाले. बाकी सिराज आणि जडेजाला एकही विकेट मिळवता आली नाही.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा