Neeraj Chopra  
क्रीडा

Neeraj Chopra : ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राला लेफ्टनंट कर्नल मानद उपाधी

ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरजला सैन्यात पदोन्नती

Published by : Team Lokshahi

थोडक्यात

  • नीरज चोप्राला लेफ्टनंट कर्नल मानद उपाधी

  • ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरजला सैन्यात पदोन्नती

  • संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

(Neeraj Chopra) ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता आणि भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याला बुधवारी टेरीटोरियल आर्मीमध्ये मानद लेफ्टनंट कर्नल पद प्रदान करण्यात आले. ‘साउथ ब्लॉक’ येथे झालेल्या या पिपिंग समारंभात राजनाथ सिंह यांनी नीरज चोप्राला मानद पदाचे चिन्ह प्रदान केले. या वेळी लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी तसेच भारतीय लष्कर आणि टेरीटोरियल आर्मीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

“लेफ्टनंट कर्नल (मानद) नीरज चोप्रा शिस्त, समर्पण आणि राष्ट्रीय अभिमान यांचे सर्वोच्च प्रतीक आहेत. केवळ क्रीडा क्षेत्रातील नव्हे, तर भारतीय सशस्त्र दलातीलही नव्या पिढ्यांसाठी प्रेरणास्थान आहेत,” असे राजनाथ सिंह यांनी चोप्रा आणि त्याच्या कुटुंबीयांशी संवाद साधताना सांगितले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नीरज चोप्राला 16 एप्रिल 2025 रोजी टेरीटोरियल आर्मीतील मानद पद देण्यास मान्यता दिली होती. हे पद त्याच्या देशासाठीच्या उल्लेखनीय कामगिरी व सेवेसाठी दिले गेले आहे.

हरियाणातील पानीपत जिल्ह्यातील खांद्रा गावचा 27 वर्षीय नीरज चोप्रा 26 ऑगस्ट 2016 रोजी भारतीय लष्करात नाईब सुबेदार म्हणून दाखल झाला. त्याने ‘राजपुताना रायफल्स’मध्ये सेवा बजावली असून 2021 मध्ये त्याची सुबेदारपदी, तर 2022 मध्ये सुबेदार मेजरपदी बढती झाली. नीरज चोप्राने 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून भारताला ॲथलेटिक्समध्ये पहिल्यांदाच सुवर्ण मिळवून दिले. त्यानंतर त्याने 2023 वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक आणि 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले. तसेच त्याने आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा आणि डायमंड लीगमधूनही अनेक सुवर्णपदके पटकावली आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा