T20 World Cup | Paddy Upton | Team India team lokshahi
क्रीडा

paddy upton : टीम इंडियाने या अनुभवी खेळाडूला T20 विश्वचषकासाठी संघात केलं सामील, कारण...

द्रविड आणि पॅडी 2010 मध्ये एकत्र होते

Published by : Shubham Tate

Paddy Upton Team India T20 World Cup 2022 : सर्व संघ T20 विश्वचषक 2022 साठी सज्ज होत आहेत. संघांचे खेळाडूही त्याच दिशेने वाटचाल करत आहेत. या स्पर्धेबाबत टीम इंडियासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. वृत्तानुसार, बीसीसीआयने पॅडी अप्टनचा सपोर्ट स्टाफमध्ये समावेश केला आहे. त्यांच्याकडे मेंटल कंडिशनिंग कोचची जबाबदारी देण्यात आली आहे. 53 वर्षीय पॅडी भारताच्या विश्वचषक विजेत्या संघाचा एक भाग आहेत. 2011 मध्ये ते भारतीय संघाचा भाग होते. (paddy upton connected with team india as a mental conditioning coach for t20 world cup)

क्रिकबझवर प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, राहुल द्रविडने पॅडीला टीम इंडियामध्ये समाविष्ट करण्याची सूचना केली असावी. द्रविड आणि पॅडी 2010 मध्ये एकत्र होते. आयपीएलमध्ये पॅडीने राजस्थान रॉयल्ससाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्सनेही जबाबदारी सोपवली. आता ते पुन्हा एकदा राहुल द्रविडसोबत दिसणार आहेत.

एका न्यूज वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "पॅडी वेस्ट इंडिजमध्ये मानसिक कंडिशनिंग प्रशिक्षक म्हणून सामील होणार आहे आणि टी -20 विश्वचषकापर्यंत ते आपली जबाबदारी पार पाडणार आहेत."

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या कामांना यश मिळण्याची शक्यता , कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली