SAFF Championship 2023 Team Lokshahi
क्रीडा

SAFF Championship 2023 : SAFF स्पर्धेत भारताकडून पाकिस्तानचा दारूण पराभव; 4-0 ने उडवला धुव्वा

सौदी अरेबियन फुटबॉल फेडरेशन चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा 4-0 ने धुव्वा उडवला. या सामन्यात धक्काबुक्कीही झाली पण भारताने आपला दबदबा कायम ठेवला.

Published by : Sagar Pradhan

मुंबई: क्रिकेटच्या मैदानानंतर आता आज फुटबॉलमध्ये हे दोन्ही संघ समोरासमोर आले. सौदी अरेबियन फुटबॉल फेडरेशन चॅम्पियनशिप स्पर्धेत या दोन्ही संघात हायहोल्टेज सामना पार पडला. त्यात भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवत विजयी सलामी दिली आहे. भारतीय संघाने या सामन्यात सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखालील संघाने 4-0 दणदणीत विजय मिळवला. विशेष म्हणजे शेवटच्या मिनिटापर्यंत पाकिस्तानचे खेळाडू गोल करण्यासाठी झुंजले. मात्र, गोल करण्यात अयशस्वी ठरले. त्यामुळे भारताचा दणदणीत विजय झाला.

भारताने पहिल्या डावापासून आक्रमक सुरुवात केली. पहिल्या डावाच्या 10 व्या मिनिटाला कर्णधार सुनिल छेत्रीने गोल केला आणि 1-0 अशी आघाढी घेतली. त्यानंतर 15 व्या मिनिटाला दुसरा गोल करत 2-0 ने आघाडी घेत पाकिस्तानवर दबाव आणला. यामुळे पाकिस्तानचे खेळाडू सैरभैर झाले. सामन्याच्या 45 व्या मिनिटाला असं काही घडलं की पाकिस्तानच्या खेळाडूंनी आपला राग व्यक्त केला. मध्यंतरापर्यंत भारत २-० ने आघाडीवर होता. दुसरा हाफ भारतासाठी अधिक सोपा ठरला. छेत्रीने हॅट्ट्रिक पूर्ण केली तर उदांता सिंगने शेवटच्या 10 मिनिटांत एक गोल केला. भारताने 4-0 असा विजय मिळवला आणि सलग सातव्या सामन्यात क्लीन शीट राखली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा