IPL 2024 
क्रीडा

IPL 2024: पॅट कमिन्सने आयपीएलमध्ये रचला इतिहास! 'असा' कारनामा केल्यानं सर्वांच्याच उंचावल्या भुवया

आयपीएलच्या क्वालिफायर २ सामन्यात सनरायजर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा ३६ धावांनी पराभव केला. या विजयामुळं एसआरएचने आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

Published by : Naresh Shende

Pat Cummins Record In IPL As Captain : आयपीएलच्या क्वालिफायर २ सामन्यात सनरायजर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा ३६ धावांनी पराभव केला. या विजयामुळं एसआरएचने आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. पॅट कमिन्सच्या जबरदस्त नेतृत्वामुळं एसआरएचला फायनलमध्ये पोहचणं शक्य झालं. सेमिफायनलच्या सामन्यात अभिषेक शर्माला गोलंदाजी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय कर्णधार पॅट कमिन्सने घेतला. अभिषेकने संजू सॅमसन आणि हेटमायरला बाद करून सामना हैदराबादच्या बाजूनं फिरवलं. याशिवाय शेहबाजने ३ विकेट घेत राजस्थानची कंबर मोडली. या सामन्यात कमिन्सने एक विकेट घेतला. पण याचसोबत कमिन्सने आयपीएलमध्ये एक जबरदस्त विक्रमाला गवसणी घातली आहे.

गोलंदाज आणि कर्णधार म्हणून पॅट कमिन्स एका आयपीएल हंगामात सर्वात जास्त विकेट घेणारा दुसरा कर्णधार बनला आहे. या हंगामात कर्णधार कमिन्सने आतापर्यंत १७ विकेट घेतल्या आहेत. या प्रकारात सर्वात जास्त विकेट घेण्याचा कारनामा शेन वॉर्नने केला आहे. वॉर्नने २००८ मध्ये राजस्थानसाठी १९ विकेट घेतले होते. तर अनिल कुंबलेने २०१० मध्ये आरसीबीचा कर्णधार म्हणून खेळताना १७ विकेट घेतले होते. तर अश्विनने २०१९ मध्ये पंजाब किंग्जचा कर्णधार म्हणून १५ विकेट घेतले होते.

एका आयपीएलमध्ये सर्वात जास्त विकेट घेणारे कर्णधार

19- शेन वॉर्न (RR 2008)

17 - पॅट कमिन्स (SRH,2024)*

17- अनिल कुंबळे (RCB,2010)

15 - रविचंद्रन अश्विन (PBKS, 2019)

15- शेन वॉर्न (RR,2009)

हैदराबादचा संघ तिसऱ्यांदा आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. राजस्थान आणि हैदराबादच्या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकली होती. कर्णधार संजू सॅमसनने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर हैदराबादने प्रथम फलंदाजी करत ९ विकेट्स गमावून १७५ धावा केल्या होत्या. या धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या राजस्थानने २० षटकांत ७ विकेट्स गमावून १३९ धावा केल्या. त्यामुळे हैदराबादचा या सामन्यात ३६ धावांनी विजय झाला. आता २६ मे ला चेपॉक स्टेडियममध्ये हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात फायनलचा सामना होणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा